Benefits Of Eating Crab – खेकडे खाण्याचे हे आहेत आरोग्यवर्धक फायदे, वाचा

Benefits Of Eating Crab – खेकडे खाण्याचे हे आहेत आरोग्यवर्धक फायदे, वाचा

उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे हे तीन ऋतू हिंदुस्थानात आपल्याला अनुभवण्याास मिळतात. या प्रत्येक ऋतूची स्वतःची अशी एक खासियत आहे आणि त्यांची खास महतीही आहे. ऋतूबदलाप्रमाणे आपण आपल्या आहारातही बदल करत असतो. सध्या पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळा सुरु झाल्यावर, आपल्या जिभेला चटकमटक पदार्थ खाण्याचे वेध लागतात. पावसाळा हा अनेक चटकदार आणि गरमागरम पदार्थ खाण्याचा सीझन. म्हणूनच पावसाची चाहूल लागताच, अस्सल मासांहरी प्रेमी खेकडे बाजारात कधी येतात याकडे डोळे लावून बसतो.

Crab Legs with Garlic Butter Sauce

खेकडे हे आपल्याकडे तिन्ही ऋतूंमध्ये मिळतात. परंतु पावसात खेकडे खाण्याची मजा ही काही औरच असते. मस्त गरमागरम खेकड्यांचा रस्सा भुरके मारुन पिण्यात जो आनंद आहे तो शब्दात व्यक्त करताच येणार नाही. तो आनंद अनुभवायलाच हवा. पावसाळ्यामध्ये खेकड्यांची पैदास ही मोठ्या प्रमाणात वाढते. म्हणूनच बिळामध्ये लपलेले खेकडे पावसाच्या पाण्याने बिळ भरल्यामुळे बाहेर पडतात. पावसाळ्यात म्हणूनच आपल्याला बाजारात मुबलक खेकडे खायला मिळतात.

खेकडा खाणे आपल्या आरोग्यासाठी का गरजेचे आहे?

 

खेकडा खाणे हे आपल्या हाडांच्या बळकटीसाठी फार महत्त्वाचे आहे.

खेकडा खाण्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते.

खेकडा हा उर्जेचे भांडार आहे, त्यामुळे आपल्या शरीरास उर्जा मिळण्यास मदत होते.

खेकड्यांमध्ये प्रथिने, ओमेगा-3 फॅटी ऍसिड, व्हिटॅमिन बी12 आणि सेलेनियम भरपूर प्रमाणात असते. हे सर्व घटक आपल्या निरोगी आरोग्यासाठी खूप गरजेचे असतात.

खेकड्यामध्ये ओमेगाचे प्रमाण खूप असल्याने, खेकडा आपल्या केसांच्या वाढीसाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची भूमिका बजावतो.

खेकडा खाण्यामुळे आपले वजन कमी करण्यासही मोठी मदत होते.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;