…तर बकरी ईदला रक्ताचे पाट वाहतील, उत्तर प्रदेशच्या मंत्र्याची धमकी

…तर बकरी ईदला रक्ताचे पाट वाहतील, उत्तर प्रदेशच्या मंत्र्याची धमकी

उत्तर प्रदेशमध्ये बकरी ईदला मुस्लिमांना गायींची कत्तल करू देणार नाही आणि जर मुस्लिमांनी बंदी असलेल्या प्राण्यांची कत्तल केली तर मुस्लिमांचीही कत्तल केली जाईल आणि कुशीनगरमध्ये रक्ताचे पाट वाहतील, अशी उघड धमकी भाजपचे मंत्री राजेश्वर सिंह यांनी दिली आहे. सिंह यांच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे.

मुस्लिमांचा बकरी ईद सण उद्या शनिवार, 7 जून रोजी देशभरात साजरा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर कुशीनगर जिह्यात बोलताना मंत्री राजेश्वर सिंह म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी प्रतिज्ञा करूया की, बंदी असलेल्या कोणत्याही प्राण्याची कत्तल केली जाणार नाही.

बंदी असलेला प्राणी म्हणचे गाय. आपल्याला तिचे रक्षण करावे लागेल. त्यामुळे आम्ही गाय, वासरू किंवा उंट अशा कोणत्याही प्राण्याची शिकार करू देणार नाही. जर बंदी असलेल्या प्राण्यांची कत्तल केली तर कुशीनगरमध्ये रक्ताचे पाट वाहतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;