Tushar Ghadigaonkar – मराठी चित्रपटसृष्टी हादरली, तरुण अभिनेता तुषार घाडीगावरनं मृत्युला कवटाळलं

Tushar Ghadigaonkar – मराठी चित्रपटसृष्टी हादरली, तरुण अभिनेता तुषार घाडीगावरनं मृत्युला कवटाळलं

छोट्या पडद्यांवरील मालिका, नाकट, चित्रपटांमधून विविधांगी भूमिका साकारत रसिकांच्या मनात स्थान मिळवलेला तरुण अभिनेता तुषार घाडीगवर याने आत्महत्या केली आहे. काम मिळत नसल्याच्या नैराश्याने त्याने मृत्युला कवटाळले. यामुळे मराठी चित्रपटसृष्टी हादरली असून कलाविश्वात खळबळ उडाली आहे.

अभिनेता अंकुश वाढवे याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तुषार घाडीगावकर याचा फोटो शेअर केला आहे. तुषारने आत्महत्या केल्याने अंकुशला धक्का बसला आहे. ‘मित्रा का? कश्यासाठी? काम येतात जातात! आपण मार्ग काढले पाहिजे पण आत्महत्या हा मार्ग नाही! मान्य आहे सध्याची परिस्थिती विचित्र आहे पण हा निर्णय नाही होऊ शकत तुषार घाडीगावकर तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो”, असे अंकुशने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अंकुशच्या पोस्टवर अभिनेते वैभव मांगले यांनीही कमेंट केली आहे. “माणसं आतून खूप तुटलेली असू शकतात… अपेक्षा आणि वास्तव यांचं गणित कधीच जुळतं नाही… दोहोंमधली दरी वाढते आहे.. लोक बोलत नाहीत… ऐकायला कान नाहीत… उत्तरे काढायला कुणाला वेळ नाही.. आत्मीयता नाही. अशी माणसं नंतर नंतर एकटी पडत असावीत का ?? सगळ्यात असून”, असे त्यांनी म्हटले.

अभिनेता तुषार घाडीगावकर याने मालिका, नाटक, चित्रपट, वेब सीरिजमध्ये काम केलेले आहे. त्याने हिंदीतही काम केले असून अभिनेता संजय दत्त याच्यासोबतही तो एका जाहिरातीमध्ये झळकला होता. त्याने मन कस्तुरी रे, भाऊबळी, झोंबिवली, हे मन बावरे, संगीत बिबट आख्यान, लवंगी मिरची यासारख्या प्रोजेक्टमध्ये काम केले होते.

तो दिग्दर्शनही करायचा आणि लेखकही होता. मात्र काम मिळत नसल्याने तो नैराश्यात होता. याच नैराश्यातून त्याने आत्महत्या केली. यामुळे त्याचे मित्र, कुटुंबीय यांना धक्का बसला असून मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;