निकटवर्तीयांमुळेच मुख्यमंत्र्यांचे कारागृह घोटाळ्यावर पांघरूण, राजू शेट्टी यांचा आरोप

निकटवर्तीयांमुळेच मुख्यमंत्र्यांचे कारागृह घोटाळ्यावर पांघरूण, राजू शेट्टी यांचा आरोप

राज्याच्या कारागृहातील 500 कोटीच्या घोटाळ्यातील प्रमुख तत्कालीन अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता आणि कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचे अनेक कारनामे उघडकीस आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या तेजस मोरे याच्यासोबत सुपेकरांचे कनेक्शन असल्यानेच फडणवीस यांनी कारागृह घोटाळ्याच्या प्रकरणावर पांघरूण घातल्याचा खळबळजनक आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केला.

राज्यातील कारागृहात तीन वर्षांत सुमारे 500 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा खळबळजनक आरोप राजू शेट्टी यांनी केल्यानंतर मुख्यमंत्री, मुख्य सचिव व गृहसचिव यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची लेखी मागणी केली होती. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे या प्रकरणावर भेटीसाठी वेळ मागितला असता, त्यांनी भेट देण्यास टाळाटाळ केली आहे. याबाबत राज्याचे मुख्य सचिव व गृहसचिव यांची भेट घेतली असता, त्यांनी चौकशी सुरू असल्याचे सांगितले. सध्या राज्याच्या प्रशासनात मुख्य सचिव यांच्यानंतर मुख्यमंत्री हेच राज्याचे प्रमुख व वरिष्ठ असून, त्यांनी या घोटाळ्याच्या चौकशीबाबत टाळाटाळ करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

तेजस मोरे हा कोणताही अधिकारी व ठेकेदार नाही; पण कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून प्रशासनातील अनेक कामे मार्गी लावण्याचे काम करीत आहे. त्याच्यावर याआधी फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल झाले असतानाही त्याचा मंत्रालयात वावर असतो.

तत्कालीन अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता, जालिंदर सुपेकर तसेच पुणे कार्यालयातील वरिष्ठ प्रशासन अधिकारी सत्यवान हिंगमिरे, तुरुंग अधीक्षक प्रशांत मत्ते, जेलर शाहू विभूषण दराडे, लेखनिक गौरव जैन, सुनील ढमाळ, अधीक्षक येरवडा कारागृह, अतुल पट्टेकरी क्लार्क येरवडा कारागृह या सर्वांची, तसेच त्यांच्या संपत्तीची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही राजू शेट्टी यांनी यावेळी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;