राज्य सरकारची गाडी खिळखिळी झालेली आहे, संजय राऊत यांची टीका

राज्य सरकारची गाडी खिळखिळी झालेली आहे, संजय राऊत यांची टीका

एकनाथ शिंदे जर त्या गाडीला बसले असतील तर गाडीला अपघात करून दरवाजातून मी कशी उडी मारेन हे पाहतील. तसेच या राज्य सरकारची गाडी खिळखिळी झाली आहे असेही संजय राऊत म्हणाले.

आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र आहे हे आपण कायम सांगतोय. पण युनाटेड नेशन्सने एका समितीचे उपाअध्यक्षपद पाकिस्तानकडे देत आहे. याचा अर्थ गेल्या 10 वर्षात आपले परराष्ट्र धोरण फसलं आहे. या साठी सर्वात आधी जयशंकर यांनी राजीनामा घेतला पाहिजे. संपूर्ण जगात हिंदुस्थानला कमकुवत करण्याचे षडयंत्र रचले जात आहे आणि त्यासाठी हे सरकार जबाबदार आहे. राहुल गांधींनी सांगितले आहे की हे सरेंडर आहे. तसेच भाजपचे नेते आपल्याच देशाला आणि देशवासियांना घाबरतात. हे लोक लोकशाहीला घाबरतात असेही संजय राऊत म्हणाले.

राज्य सरकारची गाडी खिळखिळी झालेली आहे. एकनाथ शिंदे जर त्या गाडीला बसले असतील तर गाडीला अपघात करून दरवाजातून मी कशी उडी मारेन हे पाहतील असे संजय राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीस विचार करतील यांना ढकलून मी सगळी गाडी कशी ताब्यात घेईन? आणि या दोघांनी उडी मारल्यानंतर आपण कसे ड्रायव्हिंग सीटवर बसू असा विचार अजित पवार करत आहेत असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;