अमरनाथ यात्रेसाठी 50 हजार सीआरपीएफ जवान तैनात, ड्रोन आणि जॅमरचाही होणार वापर

अमरनाथ यात्रेसाठी 50 हजार सीआरपीएफ जवान तैनात, ड्रोन आणि जॅमरचाही होणार वापर

जम्मू कश्मीरमच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाला होता आणि त्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी 50 हजार सीआरपीफचे जवान तैनात असणार आहेत. तसेच अमरनाथ यात्रेसाठी जॅमर आणि ड्रोनचाही वापर केला जाणार आहे. पवित्र गुहेतलं मंदिर आणि बाबा बर्फानीचे दर्शन घेण्यासाठीची यात्रा यंदा 38 दिवसांची करण्यात आली आहे.

या 38 दिवसांच्या अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी 50 हजार सीआरपीएफचे जवन, जॅमर आणि ड्रोनही तैनात असलीत. ही यात्रा सुरक्षित व्हावी म्हणून एवढी सुरक्षा ठेवण्यात आली आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये हल्ला झाला होता. त्यानंतर अमरनाथ यात्रेची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

3 जुलै रोजी ही यात्रा सुरू होईल तर 9 ऑगस्टला ही यात्रा संपले. ज्या भागातून यात्रेकरूंचा ताफा अमरनाथ यात्रेसाठी जाईल ते मार्ग इतरांसाठी काही वेळ बंद ठेवण्यात येईल. तसेच यात्रेकरुंच्या सुरक्षेसाठी ओपनिंग पार्टी, धोका निर्माण झाल्यास क्विक अॅक्शन टीम, बॉम्ह डिफ्युजल स्क्वाडसुद्धा असणार आहे. त्याशिवाय प्रशिक्षित कुत्रे आणि ड्रोन्सचाही वापर केला जाणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;