मिर्ची खाल्ली किंवा तिखट लागल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळा, महागात पडेल चूक; 90 टक्के लोकांना माहित नसेल कारण

मिर्ची खाल्ली किंवा तिखट लागल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळा, महागात पडेल चूक; 90 टक्के लोकांना माहित नसेल कारण

अनेकांना मसालेदार पदार्थ खायला आवडतात. पण अचानक अनेकदा दाताखाली पटकन मिर्ची येते जीभ झोंबू लागते. तोंडाची जळजळ होते. डोळ्यांतून पाणी येऊ लागते आणि कान आणि डोळे लाल होऊ लागतात. अशा वेळी, लोक सहसा टेबलावर ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलतात आणि संपूर्ण पाणी पितात. पण, यामुळे पोट भरतं पण जळजळ काही कमी होत नाही. उलट, पाणी पिल्याने तोंडापासून पोटापर्यंत जळजळ अजून वाढते. मग मिर्ची खाल्ल्यावर पाणी पिणे योग्य नसेल तर मग तोंडांची जळजळ कमी करण्यासाठी नक्की काय करावं, जेणेकरून तोंडात होत असेलला तिखटाचा त्रास पटकन कमी होईल? चला जाणून घेऊयात.

पाण्याऐवजी हा पदार्थाचे सेवन करा

मिरच्यांच्या जळजळीपासून आराम मिळवण्यासाठी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन खूप प्रभावी आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये केसीन नावाचे रसायन असते . ते त्वचे आणि तोंडातील जळजळीला त्वरित शांत करते.जर तुम्ही दूध, दही किंवा अशा गोष्टी काही काळ तोंडात ठेवल्या तर तुम्हाला जळजळ होण्यापासून त्वरित आराम मिळेल. हा उपाय हातांवर जळजळ झाल्यास देखील उपयुक्त आहे.

गोड पदार्थ खा
जर त्यावेळी तुमच्या जवळ दूध उपलब्ध नसेल तर लगेच काहीतरी गोड पदार्थ खा. विशेषतः दुधापासून बनवलेल्या मिठाई जळजळ लवकर शोषून घेण्याचे काम करतात. यामुळे थोड्याच वेळात आराम मिळतो.

पाणी पिणे टाळा
पाणी पिल्याने मिर्ची जळजळ कमी होण्याऐवजी वाढते. मिर्चीमध्ये असलेले कॅप्सेसिन हे तेल-आधारित संयुग आहे, जे पाण्यासोबत पसरू शकते आणि पोट आणि आतड्यांमध्ये आणखी जळजळ होऊ शकते. म्हणून, पाण्याऐवजी दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करावे.

पाणी पिऊन या वेदना जास्त वाढण्याची शक्यता

खरंतर, खूप मिर्च्या जेवणातून पोटात जाणे किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर, जळजळ होण्याची भावना अनेकांसाठी खूप वेदनादायक असू शकते.त्यामुळे कधी तिखट खाल्ल्याने तोंड भाजलं किंवा जळजळ झाली तर पाणी पिण्याऐवजी गोड पदार्थ खा. अन्यथा पाणी पिऊन या वेदना जास्त वाढण्याची शक्यता असते.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;