Diet Tips For Sugar Patients- निरोगी राहण्यासाठी मधुमेहींनी हे पदार्थ आहारात समाविष्ट करायलाच हवेत

Diet Tips For Sugar Patients- निरोगी राहण्यासाठी मधुमेहींनी हे पदार्थ आहारात समाविष्ट करायलाच हवेत

मधुमेहींसाठी आहार हा खूप महत्त्वाचा मानला जातो. योग्य वेळी खाणं हे मधुमेहींसाठी खूप गरजेचे मानले जाते. याशिवाय मधुमेहींना आहारामध्ये फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य यांचा समावेश करणे हे खूप गरजेचे आहे. हा आहार केवळ मधुमेहींसाठी नाही तर, सर्वांसाठी गरजेचा आहे. मधुमेही रुग्णांच्या आहारात फायबर फार महत्त्वाची भूमिका बजावते. फायबरमुळे शरीराचे अन्न पचवण्याचे प्रमाण नियंत्रित करते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. फायबरयुक्त पदार्थांमध्ये भाज्या, फळे, शेंगा, बीन्स यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

मधुमेही रुग्णांनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी निरोगी आहाराचा मार्ग अवलंब करणे सर्वात सोयीस्कर. वजन कमी करायचे असेल, तर तुमच्या उद्दिष्टांनुसार प्लॅनिंग करायला हवे. मधुमेहाचे व्यवस्थापन करण्याव्यतिरिक्त, निरोगी आहाराचे इतर फायदे देखील आहेत. कारण या आहारात भरपूर प्रमाणात फळे, भाज्या आणि फायबरची शिफारस केली जाते, त्यामुळे त्याचे पालन केल्याने हृदयरोग आणि विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होण्याची शक्यता असते.

मधुमेहामुळे रक्तवाहिन्या बंद होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. म्हणूनच जास्त चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ आणि लोणी, बीफ, हॉट डॉग, सॉसेज आणि बेकन सारखे प्राणी प्रथिने टाळा. नारळ आणि पाम तेलचा वापर मर्यादित करायला हवा. प्रक्रिया केलेले स्नॅक्स, बेक्ड पदार्थ तसेच ट्रान्स फॅट्स टाळावे. उच्च चरबीयुक्त प्रथिने, अंड्याचा पिवळा भाग या गोष्टी खाण्यामध्ये टाळणे हितावह आहे.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;