4 वर्षांपूर्वी मुलाच्या लग्नाचा बार उडवला, आता स्वत: बोहल्यावर चढले; महुआ मोईत्रा यांचे पती पिनाकी मिश्रा कोण आहेत?

4 वर्षांपूर्वी मुलाच्या लग्नाचा बार उडवला, आता स्वत: बोहल्यावर चढले; महुआ मोईत्रा यांचे पती पिनाकी मिश्रा कोण आहेत?

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी बिजू जनता दलचे नेते आणि माजी खासदार पिनाकी मिश्रा यांच्याशी लग्न केले. जर्मनीमध्ये निवडक लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याचे फोटोही समोर आले असून महुआ मोईत्रा यांनीही आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवर याचे फोटो शेअर केले आहेत. तेव्हापासून महुआ मोईत्रा यांचे पती पिनाकी मिश्रा यांच्याबाबत इंटरनेटवर सर्च केले जात आहे.

पिनाकी मिश्रा यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1959 रोजी ओडिशातील कटक येथे झाला. चार वेळा खासदार राहिलेले पिनाकी मिश्रा 65 वर्षांचे असून हे त्यांचे दुसरे लग्न आहे. त्यांचे पहिले लग्न 16 जानेवारी, 1984 ला संगीता मिश्रा यांच्यासोबत झाले होते. पहिल्या पत्नीपासून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

पिनाकी मिश्रा यांना मोठा राजकीय वारसा लाभला आहे. त्यांचे वडिलांचे नाव लोकनाथ मिश्रा आहे. पिनाकी यांचे आजोबा पंडित गोदावरीश मिश्रा हे ओडिशा राज्याच्या संस्थापकांपैकी एक असून त्यांचे वडील लोकनाथ हे देखील खासदार राहिले आहेत. तसेच आसाम, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम केले.

चार वर्षांपूर्वी मुलाचे लग्न

पिनाकी मिश्रा यांनी आपल्या राजकीय कारकि‍र्दीची सुरुवात काँग्रेसपासून केली आणि त्यानंतर ते बिजू जनता दलात आले. ते सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञही असून अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केलेले आहे. पिनाकी यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट कधी दिला याबाबत माहिती नाही. 2019 पर्यंत ते सोबत होते. याच वर्षी त्यांचा मुलगा धनराज याचेही लग्न लावण्यात आले होते. धनराजने लव्ह मॅरेज केले होते. जयपूरच्या कॉलेजमध्ये एकत्र शिकणाऱ्या देवकी पायल हिच्यासोबत धनराजने लग्न केले. त्यानंतर आता चार वर्षांनी पिनाकी स्वत: बोहल्यावर चढले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;