युक्रेनच्या ‘ऑपरेशन स्पायडरवेब’ला रशियाचा करारा जवाब; बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वर्षाव, ड्रोन हल्ल्यांनी केलं बेजार

युक्रेनच्या ‘ऑपरेशन स्पायडरवेब’ला रशियाचा करारा जवाब; बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वर्षाव, ड्रोन हल्ल्यांनी केलं बेजार

रशियाने युक्रेनच्या ‘ऑपरेशन स्पायडरवेब’ला करारा जवाब दिला आहे. रशियाने युक्रेनवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा चौफेर वर्षाव केला आहे. क्षेपणास्त्रांसह रशियाने ड्रोन हल्ल्यांनीही युक्रेनला बेजार करून टाकले आहे. या हल्ल्यांद्वारे रशियाने युक्रेनच्या सैन्याचे अनेक महत्त्वाचे अड्डे उद्ध्वस्त केले असून यात 3 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

रशियाने चारही बाजुंनी युक्रेनवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली. तसेच ड्रोनने हल्ले केला. युक्रेनच्या वायुदलाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत माहिती दिल्याचे वृत्त सीएनएनने दिले आहे.

युक्रेनची राजधानी कीवला लक्ष्य करून हे हल्ले करण्यात आले. यामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या, तर काही ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. रशियाने जाणूनबुजून रहिवासी भागांवर निशाणा साधल्याचा आरोप कीव शहरातील प्रशासकीय अधिकारी तिमूर त्काचेंको यांनी केला आहे.

दरम्यान, कीवचे महापौर विताली क्लित्सको यांनी या हल्ल्यांना दुजोरा दिला आहे. रशियाच्या हल्ल्यांमध्ये होलोसीवस्की आणि डारनित्सकी जिल्ह्यांमध्ये आगीच्या घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राजधानीतील ओबोलोन भागात हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय केली आहे. क्लित्सको यांनी नागरिकांना शेल्टरमध्ये राहण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

युक्रेनचा रशियावर ड्रोन स्ट्राईक, अणुबॉम्ब फेकणारी 41 विमाने नष्ट; ऑपरेशन स्पायडरवेब… 4700 किलोमीटर आत घुसून हल्ला

युक्रेनने केलेला रशियावर मोठा हल्ला

युक्रेनने रशियन लष्कराच्या चार हवाई तळांवर ड्रोन हल्ले केले होते. हे हल्ले इतके जबरदस्त आणि अचूक होते की त्यात रशियाच्या अणुबॉम्बचा मारा करणाऱ्या तसेच हेरगिरी करणाऱ्या 41 विमानांच्या क्षणार्धात चिंधड्या उडाल्या. ‘ऑपरेशन स्पायडरवेब’ असे नाव या कारवाईला देण्यात आले. 4700 किलोमीटर आत घुसून हे हल्ले करण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;