भरला प्रभू श्रीरामांचा दरबार!

भरला प्रभू श्रीरामांचा दरबार!

अयोध्येच्या राम मंदिरातील राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा गुरुवारी अभिजित मुहूर्तावर झाली. त्यात प्रभू श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमान मूर्ती विराजमान आहेत. मंदिराच्या गर्भगृहाच्या वर म्हणजेच पहिल्या मजल्यावर राम दरबार बांधण्यात आला आहे. या दरबारात सकाळी 11.25 ते 11.40 या वेळेत अभिषेक कार्यक्रम पार पडला.

– सूरतमधील व्यापारी मुकेश पटेल यांनी राम दरबारासाठी हिरे, सोने आणि चांदीचे दागिने दान केले आहेत.

– एक हजार कॅरेटचा हिरा, 30 किलो चांदी, 300 ग्रॅम सोन्याची आभुषणे, 300 कॅरेट माणिकापासून बनवलेले 11 मुकुट चार्टर्ड विमानाने अयोध्येत आणण्यात आले.

-प्रभू श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्या मूर्तींसाठी हार, कानातले दागिने, कपाळावर टिळा, धनुष्य आणि बाण यांचाही समावेश आहे. श्रीराम आणि सीतामाता सिंहासनावर विराजमान आहेत तर भरत आणि हनुमान त्यांच्या पायाजवळ बसले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;