दुचाकीवरील शेतकऱ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; वन विभागाने उपाययोजना करण्याची मागणी

दुचाकीवरील शेतकऱ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; वन विभागाने उपाययोजना करण्याची मागणी

आंबेगाव तालुक्यातील वाळुंजनगर येथे मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पाणी घेऊन येणाऱ्या तीस वर्षीय शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. परिसरात वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, वन विभागाने तत्काळ तोडगा काढून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी महेंद्र वाळुंज यांनी केली आहे.

मंगेश जयसिंग वाळुंज, असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. त्यास वनरक्षक योगेश निघोट यांनी मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी दिली.

खडकवाडी या ठिकाणी आतापर्यंत सहाजणांवर मागील तीन महिन्यांत बिबट्याने हल्ले केले आहेत. खडकवाडीपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या वाळुंजनगर येथे मंगेश जयसिंग वाळुंज या तीस वर्षीय युवकावर काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. ग्रामपंचायतीजवळ मंगेश हे राहत असून, पाण्याचा जार आणण्यासाठी ते गेले होते. दुचाकीवरून पाणी आणताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मागील बाजूस असलेल्या शेतातील गवतातून बिबट्याने अचानक हल्ला केला. त्यांच्या पायावर जखम झाली आहे. मंगेश याच्या मागूनच बबन वाळुंजदेखील पाणी घेऊन येत होते. मंगेशने त्यांना तत्काळ आवाज देऊन थांबण्यास सांगितले.

खडकवाडी परिसरात दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीत बिबट्याने हल्ला करण्याची ही सहावी घटना असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. फेब्रुवारीत तीन मोटारसायकल स्वारांवर बिबट्याने हल्ला केला होता. यात श्रेया मच्छिंद्र डोके या तरुणीच्या पायाला बिबट्याने चावा घेतला होता. यानंतर वाळुंजनगर येथे मोटारसायकलवर हल्ला करून गणेश दत्तात्रेय मुखेकर यांच्या पायाला चावा घेतला होता. पुन्हा खडकवाडीतील मुळूकवस्ती येथील शंकर वाळुंज व पत्नी रंजना वाळुंज हे दोघे दुचाकीवरून जात असताना बिबट्याने दुचाकीवर हल्ला केला. यामध्ये रंजना यांच्या पायाला दुखापत झाली. पुन्हा काही दिवसांतच रामदास सुक्रे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. 9 एप्रिलला मोटारसायकलवर वडिलांसोबत केक आणायला चाललेल्या 13 वर्षीय वैष्णवी मंगेश लंघे हिच्यावर बिबट्याने हल्ला केला. तर, 13 मे रोजी खडकवाडी येथील ओढ्याजवळ दशरथ कारभारी डोके यांच्यावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यानंतर काल मंगेश वाळुंज यांच्यावर वाळुंजनगर येथे हल्ला झाला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;