आयुर्वेदानुसार चुकूनही ‘या’ 5 पदार्थांचे सेवन एकत्र करू नयेत, आरोग्यासाठी ठरू शकतात घातक

आयुर्वेदानुसार चुकूनही ‘या’ 5 पदार्थांचे सेवन एकत्र करू नयेत, आरोग्यासाठी ठरू शकतात घातक

आयुर्वेदात अन्नाला खूप महत्व आहे आणि त्याचा आपल्या आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. बऱ्याचदा चवीच्या हव्यासापोटी आपण काही पदार्थांचे सेवन एकत्र करून करतो, ज्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो आणि हळूहळू शरीराला गंभीर परिणाम होतात. आयुर्वेदात याला विरुद्ध आहार असे म्हणतात. अशातच आयुर्वेदानुसार तुम्ही तुमच्या आहारात कोणते पदार्थ एकत्र खाणे टाळावे आणि का हे जाणून घेणे महत्वाचे आहे? चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात…

आयुर्वेद तज्ज्ञ किरण गुप्ता यांच्या मते, चुकीच्या फुड कॉम्बिनेशनचे सेवन केल्याने शरीरात विषारी पदार्थ तयार होऊ शकतात जे पचन प्रक्रियेत अडथळा आणतात आणि अनेक आजारांना देखील कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे तुम्हाला माहित असले पाहिजे की चुकूनही कोणतेही अन्न पदार्थ एकत्र खाऊ नयेत. जेणेकरून आरोग्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही.

दूध आणि मीठ ही परस्परविरोधी आहार असल्याने एकमेकांना पूरक नसतात. कारण दूधाचे स्वरूप थंड आणि गोड असल्याने दुधाचे सेवन करताना मीठयुक्त पदार्थांचे सेवन एकत्र करू नये, चुकून या पदार्थांचे सेवन केल्यास त्यांच्या तुमच्या शरीरातील रक्त शुद्धीकरण आणि त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अ‍ॅलर्जी, त्वचारोग, पचनाचे विकार, पोटदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

आयुर्वेदात दूध आणि मासे यांचे एकत्र सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. कारण या पदार्थांचे स्वरूप वेगवेगळे आहेत. मासे हे उष्ण असते आणि दूध हे थंड असते. त्यामुळे त्यांचे एकत्र सेवन केल्याने शरीरात विष निर्माण होऊ शकते. यामुळे त्वचेचे आजार, ॲलर्जी आणि एक्झिमा देखील होऊ शकतो.

आपल्यापैकी प्रत्येकजण हे फळांचे स्मूदी आणि शेक बनवतात आणि पितात, परंतु आयुर्वेदानुसार फळं आणि दूध एकत्र खाऊ नयेत. विशेषतः आंबट फळे अजिबात खाऊ नयेत. आंबट फळे दुध यांचे सेवन केल्यास पचनाच्या समस्या निर्माण करू शकतात, ज्यामुळे गॅस, अपचन, आम्लता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. मात्र तुम्ही दुधासोबत आंबा किंवा केळीसारख्या गोड फळांचा मिल्कशेक बनवुन सेवन करू शकता.

बऱ्याचदा काही लोक पोटदुखी कमी करण्यासाठी कोमट पाण्यात मध मिक्स करून पितात, जो एक विरोधाभासी आहार आहे. हो, आयुर्वेदात कोमट पाणी/चहा/दुधासोबत मध सेवन करू नये असे सांगतात. आयुर्वेदानुसार, मध कधीही गरम करू नये. गरम केल्यावर ते विषासारखे बनते, जे पचनसंस्थेवर परिणाम करते.

मधही तूपासोबत खाऊ नये. जर तूप आणि मध एकत्र करून समान प्रमाणात खाल्ले तर ते शरीरासाठी विषारी ठरू शकते. यामुळे शरीरात विषारी पदार्थ तयार होऊ शकतात आणि असंतुलन निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत, हे परस्परविरोधी पदार्थ खाणे टाळा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;