हिंदुस्थान-म्यानमार सीमेवर तणाव; सुरक्षा दलाने घुसखोरीचा डाव हाणून पाडला

हिंदुस्थान-म्यानमार सीमेवर तणाव; सुरक्षा दलाने घुसखोरीचा डाव हाणून पाडला

हिंदुस्थान-पाकिस्तानमधील संघर्ष शिगेला पोहचला आहे. तसेच हिंदुस्थान-चीन सीमेवरही तणाव आहे. त्यातच आता हिंदुस्थान- म्यानमार सीमेवरही तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अरुणाचल प्रदेशातील हिंदुस्थान-म्यानमार सीमेवर तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. सुरक्षा दलांना अरुणाचल प्रदेशच्या लोंगडिंग जिल्ह्यात पोंगचौ सर्कलवर संशयास्पद हालचालींबद्दल माहिती मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा पथकांनी गुरुवारी सीमावर्ती भागात गस्त सुरु केली.

संरक्षण मंत्रालयानुसार, घनदाट जंगलातून जाताना सुरक्षापथकांना संशयास्पद हालचाली दिसल्या. परिसरात काही अज्ञात व्यक्ती दिसल्यानंतर सुरक्षापथकांनी त्यांना हटकलं. त्यावेळी त्या अज्ञातांनी गोळीबार केला. त्याला सुरक्षा दलाने चोख प्रत्युत्तर दिलं. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु असताना अज्ञात व्यकती आंतरराष्ट्रीय सीमा पार करुन म्यानमारमध्ये पळून गेले. आसपासच्या घनदाट जंगलाचा फायदा घेत घुसखोरी करणाऱ्या व्यक्ती सीमापार करण्यात यशस्वी ठरले.

याआधी 14 मे रोजी दक्षिण मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात असम रायफल्ससोबत झालेल्या चकमकीत 10 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. चंदेल जिल्ह्याची सीमा म्यानमारला लागून आहे. या घटनांमुळे सीमभागात सुरक्षा गले सतर्क झाली आहेत. प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे. अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड आणि मिजोराम या चार राज्यांची सीमा म्यानमारला लागून आहे. त्यामुळे या राज्यातील सीमा भागातील सुरक्षा दल सतर्क आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;