NEET PG परीक्षा 3 ऑगस्टला होणार; सर्वोच्च न्यायालयाने दिली परवानगी

NEET PG परीक्षा 3 ऑगस्टला होणार; सर्वोच्च न्यायालयाने दिली परवानगी

NEET PG 2025 परीक्षा 15 जून रोजी होणार होती. मात्र, एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासाठी आणि त्याच्या तयारीसाठी जास्त वेळ लागणार असल्याचे राष्ट्रीय परीक्षा मंडळाने सांगितले. त्यामुळे ही परीक्षा 3 ऑगस्ट रोजी होणार आहे. NEET-PG राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा आयोजित करण्याची परवानगी मागणाऱ्या राष्ट्रीय परीक्षा मंडळाच्या (NBE) याचिकेला शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने मान्यता देत परीक्षा 3 ऑगस्ट रोजी घेण्याची परवानगी दिली आहे.

न्यायमूर्ती पी. के. मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने परीक्षा मंडळ आणि केंद्राला विलंबाबद्दल प्रश्न विचारला. परीक्षा जुलैच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात का घेतली जाऊ शकत नाही का? परीक्षा घेण्यास विलंब का होत आहे, असे प्रश्न खंडपीठाने विचारले. याची परीक्षा परीक्षा मंडळाने कारणे दिली. त्यावर न्यायाधीश पी.के. मिश्रा आणि न्यायमूर्ती ए.जी. मसीह यांच्या खंडपीठाने परवानगी देताना म्हटले आहे की, परीक्षा 3 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित करण्यासाठी वेळ वाढवण्याची विनंती योग्य आहे. त्यामुळे ही परवानगी देण्यात येत आहे. मात्र, यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.

सुरुवातीला, NBE च्या याचिकेवर सुनावणी करताना, खंडपीठाने विलंबाबद्दल चिंता व्यक्त केली आणि विचारले, तुम्हाला दोन महिने का हवे आहेत? यावर एनबीईने न्यायालयाला माहिती दिली की सुमारे 2.5 लाख उमेदवार आणि सुमारे 450 केंद्रे आहेत. ही परीक्षा एकाच शिफ्टमध्ये होणार असल्याने, किमान 500 केंद्रे आवश्यक आहेत. केंद्रे ओळखणे, सुरक्षा उपाययोजना करणे आणि विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रे निवडण्याची परवानगी देणे यासाठी वेळ लागेल.

न्यायाधीश ए.जी. मसीह म्हणाले की, 30 मे रोजी आदेश देण्यात आला असला तरी तुम्ही प्रक्रिया सुरू केलेली नाही. तेव्हापासून तुम्ही काय केले आहे? यामुळे अनावश्यक विलंब होत आहे. तुम्हाला दोन महिने का हवे आहेत? केंद्र आणि एनबीई दोघांनीही असे म्हटले की एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासाठी अधिक वेळ आवश्यक आहे. अखेर, सर्वोच्च न्यायालयाने त्यांची विनंती मान्य केली. 30 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने एनबीईला दोनऐवजी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर, एनबीईने 15 जून रोजी एकाच शिफ्टमध्ये नीट पीजी परीक्षा घेण्यातील व्यावहारिक आणि तांत्रिक अडचणींचा उल्लेख करत अर्ज दाखल केला. एनबीईने सर्वोच्च न्यायालयाला माहिती दिली की, परीक्षा आयोजित करण्यासाठी तांत्रिक भागीदार असलेल्या टीसीएसने 3 ऑगस्ट ही एकाच शिफ्टमध्ये नीट पीजी घेण्याची सर्वात लवकर तारीख असल्याचे सांगितले. त्यावर न्यायालयाने 3 ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;