Men’s Health – पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठी बडीशेप आहे वरदान, वाचा सविस्तर

Men’s Health – पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठी बडीशेप आहे वरदान, वाचा सविस्तर

बडीशेप आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. बडीशेपमुळे आपले पचन सुधारण्यास मदत होते. तसेच वजन कमी करण्यासाठीही खूप मदत होते. बडीशेप खाल्ल्याने पुरुषांचे लैगिंग आरोग्य सुधारते. बडीशेप ही आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठीही उत्तम मानली जाते. तसेच बडीशेप खाल्ल्याने पुरुषांमधील वंध्यत्वाची समस्या दूर होते असंही म्हटले जाते.

Male Menopause- पुरुषांनाही भेडसावते रजोनिवृत्तीची समस्या; जाणून घ्या लक्षणे, कारणे आणि उपचार

बडीशेप बहुतेकांच्या स्वयंपाकघरात असते, आपण बडीशेप खूप कमी प्रमाणात खातो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बडीशेपचा पुरुषांच्या वंध्यत्वावर मिश्र परिणाम होतो. याचा अर्थ असा की, बडीशेप खाल्ल्याने पुरुष वंध्यत्व सुधारू शकते आणि काही नकारात्मक परिणाम देखील दिसू शकतात. म्हणून पुरुष प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी बडीशेप खातात. तज्ज्ञांच्या मते, दिवसातून फक्त एक ते दोन चमचे बडीशेप खाणे पुरेसे आहे. त्याच वेळी, जर काही आरोग्य समस्या असेल तर संतुलित आहाराचा भाग बनवण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या.

आजकाल प्रत्येक व्यक्ती कामाच्या ताणाने त्रस्त आहे. याचा पुरुषांच्या वंध्यत्वावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे पुरुष त्यांच्या आहारात बडीशेपचा समावेश करू शकतात. त्यात अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. यामुळे शुक्राणूंची गतिशीलता आणि शुक्राणूंची गुणवत्ता सुधारते.

‘पॉवर’फूल लवंग तेल! लैंगिक समस्येसह ‘या’ आजारांवरही आहे वरदान!!

 

टेस्टोस्टेरॉनची पातळी सुधारते: बडीशेपमध्ये असे अनेक घटक असतात जे टेस्टोस्टेरॉनची पातळी सुधारण्यासाठी काम करतात. पुरेशा प्रमाणात त्याचे सेवन केल्याने कामवासना सुधारते. तसेच एकूण प्रजनन आरोग्य चांगले राहते.

ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करणे: बडीशेपमध्ये असे घटक देखील असतात जे ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करू शकतात. बडीशेपमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, यामुळे ताणाची प्रक्रिया मंदावते. प्रमाणात बडीशेप खाल्ल्याने शुक्राणुंचे आरोग्य सुधारते.

वंध्यत्वावर मात करण्यासाठी पुरुषांनी मर्यादित प्रमाणात बडीशेप खाणे महत्वाचे आहे. एखाद्याने जास्त प्रमाणात सेवन केले तर ते फायद्याऐवजी नुकसान करू शकते. उदाहरणार्थ, यामुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होऊ शकते.
जर तुम्हाला त्याची अ‍ॅलर्जी असेल तर ते न सेवन करणे चांगले. अ‍ॅलर्जी असल्यास ते सेवन केल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;