अशी ही पळवापळवी! लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 6 हजार 765 कोटींचा निधी पळवला!

अशी ही पळवापळवी! लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 6 हजार 765 कोटींचा निधी पळवला!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात आमची चूक झाली, अशी जाहीर कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  दिली. पण या योजनेसाठी इतर विभागाच्या निधीची पळवापळवी मात्र थांबलेली नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी नीती आयोगाचे नियम डावलून दलित, आदिवासींच्या निधीवर सरकार डल्ला मारत आहे. आता या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 6 हजार 765 कोटींचा निधीही महायुती सरकारने पळवला आहे.

काल म्हणाले, चूक झाली; आज श्रेय शिवराजसिंहांना; लाडकी बहीण योजना, अजित पवारांचे उल्टा पुल्टा

सरकारी तिजोरीत पैसे नसल्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुतीच्या अंगलट आली आहे. दर महिन्याला लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यासाठी महायुतीची दमछाक होत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 6 हजार 765 कोटी रुपयांचा निधी वर्षभरात वळवला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी महायुतीने कुठल्या विभागाचा किती निधी कसा पळवला? ते पुढील प्रमाणे…

लाडकी बहीण योजना महायुतीच्या अंगलट, नीती आयोगाचे नियम डावलून दलित, आदिवासींच्या निधीवर सरकारचा डल्ला

> सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटी 30 लाखांचा निधी दोन वेळा, म्हणजेच सामाजिक न्याय विभागाचा 820 कोटी 60 लाखांचा निधी वळवला
> आदिवासी विभागाचा आतापर्यंत 1 हजार 7 कोटी रुपयांचा निधी वळवला.
> दोन्ही विभागांचा मिळून आतापर्यंत 1827 कोटींचा निधी वळवला.
> वर्षभरात तब्बल 6 हजार 765 कोटी रुपयांचा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवणार
> मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 1320 कोटी तर घरकुल योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना (ग्राम विकास ) 1485 कोटीही वळवणार

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

काय आहे 6-6-6 फिटनेस रूल, वेट लॉससाठी हा किती आहे हेल्पफुल? काय आहे 6-6-6 फिटनेस रूल, वेट लॉससाठी हा किती आहे हेल्पफुल?
वाढते वजन ही अनेक लोकांची समस्या बनली आहे. अशात लोक वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे फिटनेस ट्रेंड फॉलो करीत असतात....
Cigarette : सिगारेटची हवेत वर्तुळं सोडताय? केवळ कॅन्सरच नाही, तर या अनेक घातक आजारांचा धोका, आताच सावध व्हा
पंतप्रधानांनी थेट ट्रम्प यांचे नाव घेतले तर ते सत्य उघड करतील; राहुल गांधींचा पुन्हा मोदींवर निशाणा
ICC Ranking – ना सूर्यादादा, ना प्रिन्स; टीम इंडियाचा युवा खेळाडू अभिषेक शर्मा टी-20 चा नवा किंग
Skin Care – आता ब्लॅकहेडस् दूर ‘हे’ घरगुती उपाय आहेत फायदेशीर
पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगारांना एक चूक महागात पडली अन्…, वाचा ‘ऑपरेशन महादेव’ची इनसाईड स्टोरी
‘एक मुकदमा कर दो… जवाहरलाल नेहरू हाजिर हों! आरजेडी खासदार मनोज झा यांची मोदी सरकारवर घणाघाती टीका