भाजपच्या मंत्र्यांकडूनही अधिकाऱ्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष; भाजपकडून गुंडांना संरक्षण

भाजपच्या मंत्र्यांकडूनही अधिकाऱ्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष; भाजपकडून गुंडांना संरक्षण

भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून महापालिकेच्या एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची पाच महिन्यांपासून छळवणूक सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्याने भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, नगरसेविका यांच्याकडेदेखील दाद मागितली. मात्र, भाजपने गुंड पदाधिकाऱ्याला समज देण्याची तसदीदेखील घेतली नाही. भाजपच्या मंत्र्यांनीही महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे भाजपच गुंडांचे संरक्षण करते का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ओंकार दिलीप कदम याच्याकडून पाच महिन्यांपासून पालिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्याला त्रास दिला जात आहे. वैद्यकीय अधिकारी यांच्या दालनात जाऊन छायाचित्रीकरण करणे, दरवाजा बंद करणे, धमकावणे असे प्रकार सुरू होते. याबाबत संबंधित अधिकाऱ्याने महापालिका आयुक्त, आरोग्य विभाग प्रमुख यांच्याकडे तक्रार केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने महापालिकेच्या अंतर्गत महिला तक्रार समितीकडे तक्रार केली होती. त्या समितीने काही निरीक्षणे नोंदवत कारवाई सुचविली. त्याकडेही दुर्लक्ष झाले. यानंतर केंद्रीय राज्यमंत्री, महिला राज्यमंत्री, नगरसेविका यांच्याकडे तक्रारी करूनही न्याय मिळाला नाही. अखेर राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. यावर आयोगाने माहिती घेत कार्यवाही सुरू केली; मात्र, भाजपकडून गुंडागर्दी करणाऱ्या पदाधिकाऱ्याला संरक्षण दिले जात असल्याचे दिसत आहे. दरम्यान, आरोग्य विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी याबाबत आपल्याकडे अहवालच आला नसल्याचे म्हटले असून त्यांनीही दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.

गुंडागर्दी खपवून घेणार नाही महापालिका आयुक्त
कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी असला तरी महापालिकेत गुंडागर्दी, दमदाटीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. अशा व्यक्तींचा महापालिकेत प्रवेश बंद केला जाईल. महापालिका आयुक्त म्हणून मलाही अशा व्यक्तींवर कारवाई करण्याचा अधिकार आहे. याप्रकरणी माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
भाजपच्या शहर पदाधिकाऱ्याकडून पालिकेच्या एका महिला वैद्यकीय आधिकारी व इतर अधिकाऱ्यांना वेठीस धरून त्रास देत असल्याची तक्रार आयुक्तांसह, शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडे केली आहे. तरीदेखील त्रास देण्याचे प्रकार सुरूच असल्याने नाईलाजाने महिला अधिकाऱ्यांनी काल महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. याप्रकरणी आपण योग्य ती कठोर पावले उचलावीत अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करू, असा इशारा देत शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे आणि महापालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;