IND Vs ENG – ‘ही तर पतौडी कुटुंबाच्या योगदानाबद्दल असंवेदनशीलता…’ सुनील गावसकर भडकले

IND Vs ENG – ‘ही तर पतौडी कुटुंबाच्या योगदानाबद्दल असंवेदनशीलता…’ सुनील गावसकर भडकले

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये 20 जून पासून पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. परंतु या करंडकाच्या नावात बदल केल्यामुळे या मालिकेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि जेम्स ऍण्डरसन यांचे नाव हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या पतौडी करंडकाला देण्यात आलं आहे. नावात झालेल्या या बदलामुळे हिंदुस्थानचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावसकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यात 2007 साली पार पडलेल्या कसोटी मालिकेला पतोडी करंडक असे नाव देण्यात आलं होते. मात्र, आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) हे नाव हटवण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयावर सुनील गावसकर यांनी नाराजी व्यक्त करत स्पोर्ट्स स्टारवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “इंग्लंड आणि हिंदुस्थान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेच्या विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पतौडी ट्रॉफीला हटवण्याचा निर्णय ECB ने घेतला आहे, ही खरोखरच त्रासदायक बातमी आहे. व्यक्तिगत खेळाडूंच्या नावाने खेळली जाणारी ट्रॉफी हटवण्याचा निर्णय घेतला असून हे पहिल्यांदाच होत आहे. हा पूर्णपणे ECB चा निर्णय आहे आणि BCCI ला बहुतेक याची माहिती देण्यात आली असेल. यावरून हिंदुस्थान आणि इंग्लंडमधील क्रिकेटमध्ये पतौडी कुटुंबाच्या योगदानाबद्दल असंवेदनशीलता दिसून येते.”, असे सुनील गावसकर म्हणाले आहेत.

IND vs ENG Test – पतौडी नव्हे तेंडुलकर-ऍण्डरसन करंडक

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;