जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल!- उद्धव ठाकरे

जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल!- उद्धव ठाकरे

मिंधे गटात बेबंदशाही आणि अंदाधुंद कारभार सुरू आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
मिंधे गटातल्या सुजाता शिंगाडे या स्वगृही परतल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिंगाडे यांनी पक्षात प्रवेश केला.

मिंधे गटात बेबंदशाही आणि अंदाधुंद कारभार सुरू आहे. लोक शिवसेना सोडून कशासाठी जातात आणि तिथे काय होतं हे सुजाता ताईंना हे कळालं आहे. मिंधे गटात गेल्यावर अनेकांना पश्चाताप होत आहे. परत येण्याची धाडस आणि किंमत ही फक्त शिवसैनिकांमध्ये आहे. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल. सुजाता ताई या परत शिवसेनेत आल्या आहेत. हे मिंधे गटात असूनही मनाने शिवसेनेत असलेल्यांसाठी हा संदेश आहे. शिवसैनिकांमध्ये कुठला संभ्रम नाही. संदेश देण्याऐवजी आम्ही बातमीच देऊ.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;