तेव्हा पाकिस्तानला हिंदुस्थानच्या ताकदीची जाणीव होईल, ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

तेव्हा पाकिस्तानला हिंदुस्थानच्या ताकदीची जाणीव होईल, ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

पंतप्रधान मोदींनी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, पाकिस्तानने फक्त माणुसकीवर हल्ला केलेला नाही तर कश्मीरच्या अस्मितेवरही हल्ला केला आहे. हिंदुस्थानात अशांतता आणि दंगली भडकवण्याची पाकिस्तानची इच्छा होती. पाकिस्तानला जम्मू कश्मीरमधील पर्यटन व्यवसायावर हल्ला करायचा आहे त्यामुळे इथल्या गोर गरीबांच्या पोटावर पाय आला असता. दहशतवाद्यांनी आदिल नावाच्या एका स्थानिक तरुणाचाही खून केला आहे. याचा अर्थ दहशतवाद्यांनी फक्त निर्दोष व्यक्तींना लक्ष्य केले आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की आज 6 तारीख आहे. सहा मे रोजी आपण ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं. आता जेव्हा पण पाकिस्तान ऑपरेशन सिंदूरच नाव ऐकेल तेव्हा त्यांना हिंदुस्थानच्या ताकदीची जाणीव होईल. त्यांनी कधी विचारही केला नव्हता की हिंदुस्थान त्यांना घुसून मारेल. हिंदुस्थानच्या या कारवाईमुळे पाकिस्तान आतून हलला आहे आणि त्यांनी जम्मू कश्मीरच्या सामान्य माणसांना लक्ष्य केले आहे. पाकिस्तान कशा प्रकारे मंदिर, मशीद आणि शाळांवर गोळीबार करतो हे संपूर्ण जगाने पाहिल्याचे मोदींनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;