प्रसिद्ध मल्याळम अभिनेता शाइन टॉम चाकोचा भीषण अपघात; वडिलांचा मृत्यू; आई, भावावर उपचार सुरू

प्रसिद्ध मल्याळम अभिनेता शाइन टॉम चाकोचा भीषण अपघात; वडिलांचा मृत्यू; आई, भावावर उपचार सुरू

मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता शाइन टॉम चाको याचा भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी सकाळी तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यात झालेल्या या अपघातात अभिनेत्याचे वडील सीपी चाको यांचे निधन झाले. तर शाइन टॉम चाको याच्यासह त्याची आई मारिया आणि भाऊ गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर रुग्णआलयात उपचार सुरू आहेत. ‘एनडीटीव्ही’ने याबाबत वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाइन टॉम चाको हा कुटुंबासोबत कारने प्रवास करत होता. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास धर्मपुरी जिल्ह्यातील पलाकोडजवळील परायू येथे महामार्गावर कार आणि ट्रकची धडक झाली. यात अभिनेत्याच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला. तर शाइन टॉम चाको, त्याची आई, भाऊ आणि चालक गंभीर जखमी झाले. जखमींवर सध्या पलाकोट्टई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शाइन टॉम चाको याचे ‘कुरुथी’ आणि ‘जिगरथंडा डबलएक्स’ हे चित्रपट प्रचंड गाजले. अजित कुमार याच्या ‘गुड बॅड अग्ली’ या चित्रपटातही तो दिसला होता. तसेच थलापती विजय याच्या ‘बीस्ट’ आणि नानीचा तमिळ चित्रपट ‘दसरा’ यातही तो झळकला होता. 2019 मध्ये आलेल्या ‘इश्क’ या चित्रपटात त्याने खलनायकाची भूमिकाही साकारली होती. यासाठी त्याला SIIMA पुरस्कारही मिळाला होता. ‘दसरा’ या चित्रपटात साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकेसाठीही त्याला पुरस्कार मिळाला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;