इंडियाला दोन वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या खेळाडूचा क्रिकेटला राम राम, 13 वर्षांपूर्वी खेळला होता अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना

इंडियाला दोन वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या खेळाडूचा क्रिकेटला राम राम, 13 वर्षांपूर्वी खेळला होता अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना

टीम इंडियाला दोन वर्ल्ड कप जिंकून देणारा खेळाडू पियुष चावला याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. एम. एस. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2007 रोजी जिंकलेल्या टी20 आणि 2011 रोजी जिंकलेल्या वन डे विश्वचषक संघाचा तो भाग होता. 13 वर्षांपूर्वी तो अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

पियुष चावला टीम इंडियाकडून 3 टेस्ट, 25 वन डे आणि 7 टी20 सामने खेळला. टेस्टमध्ये त्याच्या नावावर 7, वन डे मध्ये 32 आणि टी20 मध्ये 4 विकेट्सची नोंद आहे. त्याने IPL मध्येही दमदार खेळाचे दर्शन घडवले. जगातील सर्वात मोठ्या लीगमध्ये त्याने 192 लढतीत 192 विकेट्स मिळवल्या आहेत. IPL मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूत त्याचा तिसरा नंबर लागतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;