भूमिपुत्रांना न्याय मिळण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक, कोका कोलाविरुद्ध अजगणी येथे मूक मोर्चा

भूमिपुत्रांना न्याय मिळण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक, कोका कोलाविरुद्ध अजगणी येथे मूक मोर्चा

अजगणी येथील विस्तारित लोटे वसाहतीमधील 88 एकर जमिनीवर होत असलेल्या कोका कोला कंपनीच्या प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ अजगणी ग्रामस्थांनी आज मूक मोर्चा काढून आपला आक्रोश व्यक्त केला आहे.

लोटे वसाहतीच्या विस्तारित जागेत गतवर्षी भूमिपूजन झालेल्या कोको कोला या प्रकल्पाच्या कामात स्थानिक प्रकल्पग्रस्थांना सामावून घेण्याचे आश्वासन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले होते. मात्र ते आश्वासन देखील हवेत विरले आहे. कंपनीमधील नोकरभरती संदर्भात नोव्हेंबर 2024 पासून अजगणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पत्रव्यवहार सुरू करण्यात आला. याला कंपनी प्रशासन जुमानत नसल्याने उद्योगमंत्री यांच्या दालनात याबाबत अनेक बैठका घेण्यात आल्या तरीही कोका कोला प्रशासन स्थानिकांना सामावून घेत नाही. प्रशासनाने विविध ट्रेड केलेल्या 200 लोकांचे बायोडाटा घेतले. मात्र त्यातल्या एकालाही कामावर घेण्यात आलेले नाही. मग स्थानिकांनी जायचे कुठे? आमच्या जागा घेऊन होणाऱया कारखान्यांवर बाहेरून येणारे लोक पोट भरत असतील तर आम्ही याबाबत गप्प बसणार नसल्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;