पोलिसांनी वाचवले वृद्ध डॉक्टरचे 1 कोटी 29 लाख रुपये

पोलिसांनी वाचवले वृद्ध डॉक्टरचे 1 कोटी 29 लाख रुपये

डिजिटल अटकेच्या नावाखाली वृद्ध डॉक्टरची फसवणूक करू पाहणाऱया ठगांना पश्चिम सायबर पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. पोलिसांनी वेळीच कारवाई करून फसवणुकीच्या रकमेपैकी 1 कोटी 29 लाख रुपये वाचवले. पश्चिम सायबर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र काwतुक होत आहे.

विलेपार्ले येथे राहणारे तक्रारदार हे वृद्ध डॉक्टर आहेत. तीन दिवसांपूर्वी त्यांना पह्न आला. पोलीस, न्यायाधीशाच्या नावाने त्यांना भीती दाखवली. त्यांच्या विरोधात मनी लॉण्डरिंगप्रकरणी सहभाग आहे असे भासवण्यात आले. त्यामुळे चौकशी केली जाणार आहे. चौकशी होईपर्यंत त्यांना घरी डिजिटल अटक केली अशा भूलथापा मारल्या.

चौकशी होईपर्यंत त्यांना कोणालाही संपर्क साधता येणार नाही. नियमाचे उल्लंघन केल्यास तत्काळ अटक केली जाईल असे सांगण्यात आले. त्यानंतर ठगाने त्यांना अटकेची भीती दाखवून बँक खात्याची माहिती घेतली. ऑनलाईन व्यवहार करून 2 कोटी 89 लाख रुपये विविध खात्यांत ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. पैसे पाठवल्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पश्चिम सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस उपायुक्त पुरषोत्तम कराड यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक सुवर्णा शिंदे यांच्या पथकातील उपनिरीक्षक मंगेश भोर, बावसकर, राऊळ, पाटील, सोनाली काकड आदी पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी बँकेच्या नोडल अधिकाऱयांना संपर्क साधला. त्यानंतर बँकेने 1 कोटी 29 लाख गोठवले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;