धक्कादायक! सांडपाणी प्रक्रिया प्लाण्टमध्ये कोरोना विषाणूचे जनुकीय अंश, एनसीएलच्या तपासातून माहिती समोर

धक्कादायक! सांडपाणी प्रक्रिया प्लाण्टमध्ये कोरोना विषाणूचे जनुकीय अंश, एनसीएलच्या तपासातून माहिती समोर

पुणे शहरासह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता पुणेकरांची चिंता वाढवणारी माहिती पुढे आली आहे. शहरातील सर्व सांडपाणी प्रक्रिया प्लॅण्टमध्ये कोरोना विषाणूचे जनुकीय अंश सापडले असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेच्या (एनसीएल) तपासातून समोर आली आहे. राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेकडून 22 एप्रिल आणि 6 मे रोजी घेण्यात आलेले सांडपाण्याचे नमुने पॉझिटिव्ह आढळले असून, या सांडपाण्यात मिळालेल्या विषाणूंच्या जनुकीय अंशांची पातळी ही कोविड काळात जशी होती, तशीच आताही आहे.

सांडपाणी प्रक्रियेतून मिळणाऱ्या नमुन्यांच्या तपासणीतून तीव्र श्वसन सिंड्रोम कोरोना व्हायरस-2 (SARS-CoV-2) विषाणूचे जेनेटिक मटेरियल शोधले जाते. हा विषाणू संक्रमित व्यक्तींच्या मलमुत्रातून बाहेर पडतो. एनसीएलच्या वेस्टवॉटर सर्व्हिलन्स पद्धतीमुळे प्रशासनाला संपूर्ण शहरात कोरोनाच्या प्रसाराची पूर्वसूचना मिळते. तसेच कोरोनाचे संक्रमण आणि निदान न झालेल्या रुग्णांची माहिती आधीच उपलब्ध होते. सध्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना एनसीएलचे निरीक्षण हे आरोग्य विभागास रुग्णांचा मागोवा घेण्यास उपयोगी ठरणारे असल्याचे राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेचे मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. महेश धर्णे यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;