पोष्टिक अशा या कोशिंबीरी आपल्या रोजच्या आहारात असायलाच हव्यात, वाचा सविस्तर

पोष्टिक अशा या कोशिंबीरी आपल्या रोजच्या आहारात असायलाच हव्यात, वाचा सविस्तर

आपला रोजचा आहार हा पौष्टिक असणं हे खूप गरजेचं आहे. पोष्टिक आहारामुळेच आपण निरोगी जीवन सुखकरपणे जगू शकतो. म्हणूनच आहारात पंचरस असणं हे खूपच महत्त्वाचं आहे. आहारातील पंचरस हे आपल्यामध्ये रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यास खूप मदत करतात. पानातला डाव्या बाजूचा पदार्थ म्हणजेच कोशिंबीरी. कोशिंबीरी हा असा प्रकार आहे की, कधी कधी नुसती पोळी आणि कोशिंबीर पानात असेल तरी परीपूर्ण आहार होतो. आपण विविध प्रकारे कोशिंबीरी बनवू शकतो. यासाठी आपण स्वयंपाकघरात उपलब्ध अनेक प्रकारचे घटक वापरून कोशींबीर बनवू शकतो. आज आपण असेच निरोगी सलाड किंवा कोशींबीरीचे प्रकार पाहणार आहोत. हे सर्व प्रकार शरीराच्या दृष्टीने हितावह आहेच. शिवाय करायलाही अगदे साधे सोपे असेच आहेत.

अंकुरीत कडधान्याची कोशिंबीर – वजन कमी करण्यासाठी आपण या कोशिंबीरचे सेवन करू शकता. यासाठी मुगाची डाळ चांगली भिजवा आणि नंतर कोशिंबीरीसाठी वापरा.

राजमा सलाड – तुम्हाला राजमा आवडत असेल तर तुम्ही कोशिंबीरीतही वापरु शकता. याकरता उकडलेला राजमा आणि मूठभर मिक्स भाज्या आपल्याला हव्यात. राजमा मूठभर उकडून घ्यावा. त्यामध्ये 1/2 कप उकडलेला हरभरा, 1 कांदा, कप कोबी, 1 टीस्पून लिंबाचा रस, टीस्पून चाट मसाला, 2 टीस्पून चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ असे सर्व घालून मिश्रण एकजीव करावे.

फळं आणि अक्रोड कोशिंबीर – फळे आणि अक्रोड दोन्ही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. यापासून बनविलेले कोशिंबीर खाल्ल्यानंतर लगेच भूकही लागणार नाही.

आपल्या आवडीची फळे आणि अक्रोडचे तुकडे एकत्र करावेत. तसेच यामध्ये आपण विविध प्रकारची फळे घालावीत. या कोशींबीरसाठी 1 केळे, 1 सफरचंद, 6 स्ट्रॉबेरी, 1 किवी, 1 चमचे मध, 10 बदाम, 10 अक्रोड, 10 मनुका आणि 2 चमचे भोपळा बिया आवश्यक आहेत. हे सर्व मिक्स करावे. खासकरून वजन कमी करणारे आहेत त्यांनी ही कोशिंबीर अवश्य करून खावी.

स्प्राउट्समध्ये प्रोटीनचे प्रमाण खूप जास्त आहे. हे कॅलरीमध्ये खूप कमी आहे, जे वजन कमी करण्यास मदत करते. यासाठी 1 कप अंकुरलेली मूग डाळ, कांदा, 1 काकडी, 1 टोमॅटो, 1 टेस्पून लिंबाचा रस, 1/2 टीस्पून मिरपूड पावडर, टीस्पून चाट मसाला आणि चवीनुसार मीठ आवडीनुसार.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Buldhana News – पैशांची परतफेड केली तरीही सावकाराचा जाच सुरूच; शेतकऱ्याने विष पिऊन जीवन संपवले Buldhana News – पैशांची परतफेड केली तरीही सावकाराचा जाच सुरूच; शेतकऱ्याने विष पिऊन जीवन संपवले
मलकापुर तालुक्यातील धरणागावातील एका शेतकऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून विष प्राशन करुन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी...
समलिंगी विवाहाला मान्यता नाहीच पण ते कुटुंब बनवू शकतात! मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय
शेंद्रा एमआयडीसीच्या ट्रक टर्मिनलच्या जागेत पालकमंत्री शिरसाट पुत्राची दारूची कंपनी! इम्तियाज जलील यांचा आरोप
ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे निधन
Bangalore Stampede – विराट कोहली विरोधात तक्रार दाखल, विजयाचा जल्लोष नडणार?
ट्रेन 90 मिनिटं लेट, मदत मिळालीच नाही; क्रिकेटरचा एक्स्प्रेसमध्ये दुर्दैवी मृत्यू
Ratnagiri Fort – घेरा यशवंत गडाच्या नवीन बांधकामाची पडझड, ग्रामस्थ संतापले; पुरातत्व विभागाकडून पाहणी