मादक तरुणी अन् ‘लोलिता एक्स्प्रेस’मधील धुंद करणाऱ्या रंगेल पार्ट्या; ‘जेफ्री एपस्टिन फाइल्स’वरून मस्कचा ट्रम्पवर निशाणा

मादक तरुणी अन् ‘लोलिता एक्स्प्रेस’मधील धुंद करणाऱ्या रंगेल पार्ट्या; ‘जेफ्री एपस्टिन फाइल्स’वरून मस्कचा ट्रम्पवर निशाणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांच्या मैत्रित आता दुरावा निर्माण झाला आहे. त्यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येत आहे. यामुळे एलन मस्क यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याचा बदला म्हणून आता मस्क यांनी जुने प्रकरण उघड करायला सुरुवात केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव जेफ्री एपस्टिन फाइल्समध्ये असल्याचे एलन मस्क यांनी म्हटले आहे. आणि म्हणूनच या फाइल्स ‘टॉप सिक्रेट’ फाइल्सच्या श्रेणीत येतात. मस्क यांनी घेतलेल्या नावामुळे आता अमेरिकन राजकारणात खळबळ उडाली आहे.

उद्योगपती एलन मस्क यांनी त्यांच्या ट्वीटरवर याबाबात पोस्ट केली आहे. “आता खरोखरच मोठा बॉम्बस्फोट करण्याची वेळ आली आहे. डोनाल्ड ट्रम्पचे नाव एपस्टिन फाइल्समध्ये आहे. आणि म्हणूनच ते सार्वजनिक केले गेले नाही. तुमचा दिवस चांगला जावो, डीजेटी!”अशी पोस्ट मस्क यांनी केली आहे.

दरम्यान, एलन मस्क यांनी घेतलेले नाव जेफ्री एपस्टिन नेमके आहेत तरी कोण? ‘जेफ्री एपस्टिन फाइल्स’ म्हणजे नेमके काय आहेत? मुख्य म्हणजे या फाईल्समध्ये ट्रम्प यांचे नाव का जोडले जात आहे? याबाबत जाणून घेऊया…

कोण होता जेफरी एपस्टिन? ज्यांच्यावर आहेत मानवी तस्करीचे गंभीर आरोप

जेफ्री एपस्टिन हा एक अमेरिकन अब्जाधीश फायनान्सर होता. आपल्या अफाट संपत्तीच्या जोरावर त्याने जगातील श्रीमंतांशी संबंध निर्माण केले. एपस्टिनच्या जवळच्या व्यक्तीमध्ये डोनाल्ड ट्रम्प, बिल क्लिंटन, प्रिंस एंड्रयू यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. अब्जाधीश एपस्टिनवर लैंगिक गुन्ह्यांचाही आरोप होता. एपस्टिनवर अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीचे गंभीर आरोप होते. त्याला 13 महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.

डोनाल्ड ट्रम्पशी पंगा मस्कला महागात! दिवसभरात गमावले 150 अब्ज डॉलर

जेफ्री एपस्टिनकडे अफाट संपत्ती होती. त्याने अमेरिकेत खासगी बेटे खरेदी केली होती. त्यांचे स्वतःचे जेटही होते. अमेरिकेतील बडे लोक या जेटने त्यांच्या खासगी बेटावर पोहोचायचे. एपस्टिन हे अनेकदा लोकांना त्यांच्या खासगी जेटने बेटावर घेऊन जात असत आणि तिथे प्रवास करणाऱ्यांची लेखी नोंद ठेवत असत. अमेरिकेतील जेफ्री एपस्टिन यांच्या या खासगी जेटला ‘लोलिता एक्स्प्रेस’ असे म्हटले जात असे. माजी अध्यक्ष बिल क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी या लोलिता एक्स्प्रेसमध्ये प्रवास केला आहे, असे वृत्त न्यू यॉर्क पोस्टने दिले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किमान 7 वेळा लोलिता एक्स्प्रेसमधून प्रवास केलाय, असे इकोनॉमिक टाइम्सच्या एका वृत्तात म्हटले आहे. तर, मी कधीही एपस्टीनच्या विमानाने त्याच्या मूर्ख बेटावर गेलो नाही, असे विधान करत ट्रम्प यांनी आरोप फेटाळून लावले आहेत.

1980 ते 2000 च्या सुरुवातीच्या काळापर्यंत ट्रम्प आणि जेफ्री एपस्टिन चांगले मित्र होते. 2002 च्या एका मुलाखतीत ट्रम्प यांनी आपल्या जिगरी दोस्ताचे भरभरून कौतुक केले होते. एपस्टिनसोबत राहणं खूपच मजेदार आहे. तो एक अप्रतिम व्यक्ती आहे. त्यालाही तितक्याच सुंदर महिला आवडतात, जितक्या मला, असे ते म्हणाले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;