टपाल खात्याचा हायटेक कारभार, पिनकोडची जागा डिजिपिन घेणार

टपाल खात्याचा हायटेक कारभार, पिनकोडची जागा डिजिपिन घेणार

कुरिअर पाठवण्यासाठी तुम्हाला पिनकोड माहीत नसेल तर काही हरकत नाही. पोस्ट खात्याने डिजिपिन सेवा सुरू केली आहे. याद्वारे लोकेशन को-ऑर्डिनेटच्या आधारे डिजिटल पिनकोड तयार केला जाईल. त्याद्वारे आपले कुरिअर योग्य पत्त्यावर पोचेल. डिजिपिन ही नवीन पत्ता शोधणारी सिस्टम आहे. पोस्ट खात्याने आयआयटी हैदराबाद आणि इस्रोसोबत मिळून ही प्रणाली विकसित केलीये. या यंत्रणेअंतर्गत 4 मीटर बाय 4 मीटर आकाराचे छोटे ग्रीडचे भाग करण्यात आले आहेत. प्रत्येक भागाला युनिक आयडी देण्यात आला आहे. हा आयडी 10 आकडी अक्षरांचा एक कोड असून त्याला डिजिपिन असे म्हणतात. हा कोड कुठल्याही जागेच्या अक्षांश-रेखांशावर आधारित असेल. या यंत्रणेमुळे एखाद्या गल्लीबोळातील कुठलंही ठिकाण सहज मिळू शकते. आता कुठल्याही कुरिअरवाल्याला किंवा व्यक्तीला एखादं पार्सल तुमच्यापर्यंत पोहचवण्यात अडथळा किंवा समस्या येणार नाही.

डिजिपिन कसा जनरेट कराल

डिजिपिन जनरेट करण्यासाठी पोस्ट खात्याच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. डिव्हाईसचं लोकेशन ऑन करून लोकेशननुसार डिजिपिन तयार केला जाऊ शकेल. लोकेशन परमिशन दिल्यानंतर डिजिपिन जनरेट होईल, त्याचा वापर तुम्ही आपात्कालीन सेवा, लॉजिस्टिक, कुरिअर डिलिव्हरी, इतकंच काय तर कॅब बुक करण्यासाठीही करू शकाल.

पिनकोडपेक्षा वेगळा

डिजिपिन आणि पिनकोड दोन्ही पत्ते ओळखण्यासाठी वापरलं जात असलं तरी त्यांची काम करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. डिजिपिन ही एक डिजिटल लोकेशन सिस्टम असून कोणत्याही ठिकाणाचे अचूक स्थान ओळखणे शक्य होणार आहे. ज्याप्रमाणे पिनकोड 6 अंकी असतो त्याचप्रमाणे डिजिपिन हा 10 आकडय़ांचा किंवा अक्षरांचा कोड असतो. या प्रणालीमध्ये संपूर्ण देश 4 बाय 4 मीटरच्या ग्रिडमध्ये विभागलेला असतो आणि त्यानंतर प्रत्येक भागाला 10 अक्षरांचा कोड दिला जातो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;