‘स्पिरिट’ नंतर दीपिका पदुकोणला ‘कल्की 2’ मधूनही काढले, अवास्तव मागण्यांमुळे निर्माते बेजार

‘स्पिरिट’ नंतर दीपिका पदुकोणला ‘कल्की 2’ मधूनही काढले, अवास्तव मागण्यांमुळे निर्माते बेजार

बाॅलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने आई झाल्यानंतर, कामाचे तास कमी करण्याची केलेली मागणी आता तिच्यासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. दीपिकाच्या अवास्तव मागण्यांना कंटाळून दीपिकाला स्पिरीट या चित्रपटातून तिला डच्चू देण्यात आलेला होता. आता स्पिरीटनंतर ‘कल्की-2’ या चित्रपटातूनही दीपिकाला काढून टाकण्यात आलेले आहे.

दीपिकाच्या अव्यावसायिक मागण्यांमुळे संदीप वांगा रेड्डी नाराज झाल्यानंतर त्याने दीपिकाला थेट बाहेरचा रस्ता दाखवला होता. हा वाद ताजा असतानाच, आता दीपिकाला कल्की-2 मधूनही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे. स्पिरीट चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, दीपिकाने 8 तास काम करण्याची विनंती केली होती. तसेच दीपिकाने चित्रपटाच्या नफ्यातील वाट्यासह, मानधनातही वाढ केली होती. या मागण्यांना कंटाळून संदीप रेड्डी वांगा यांनी दीपिकाला बाहेर काढले.

संदीप रेड्डी वांगाच्या चित्रपटातून दीपिका पदुकोनला डच्चू, अव्यावसायिक मागण्यांमुळे दिग्दर्शक झालेला त्रस्त

दीपिकाला चित्रपटातून काढल्यानंतर, चित्रपटाविषयीच्या बातम्या एकामागून एक बाहेर येत राहिल्या. यामुळे दिग्दर्शकांनी दीपिका पदुकोणला त्यांच्या स्टाइलने फटकारले. नॉन डिस्क्लोजर अ‍ॅग्रीमेंट संदीप रेड्डी वांगा यांनी कोणाचेही नाव न घेता लिहिले आहे की, पुढच्या वेळी संपूर्ण कहाणी सांगा. कारण या गोष्टी मला अजिबात महत्त्वाच्या नाहीत. संदीप रेड्डी वांगा यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये लिहिले आहे की, ” मी एखादी कथा अभिनेत्याला सांगतो तेव्हा आमच्यात विश्वासार्हता असते. आमच्यात एक न बोललेला एनडीए (नॉन डिस्क्लोजर अ‍ॅग्रीमेंट) आहे. पण हा करार तोडून तसेच तुमच्यापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्रींना कमी लेखून आणि माझी कहाणी उघड करता, हाच तुमचा स्वभाव आहे का? एक चित्रपट निर्माता म्हणून, मी वर्षानुवर्षे माझ्या कलाकृतीवर कठोर परिश्रम केले आहेत आणि माझ्यासाठी चित्रपट निर्मिती हेच सर्वस्व आहे. अर्थात केलेल्या या कृत्याचा मला अजिबात फरक पडत नाही. हे सर्व बघून मला फक्त इतकेच म्हणावेसे वाटते, खुंदक में बिल्ली खंबा नोचे..

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;