आज शिवराज्याभिषेक दिन सोहळा; हजारो मावळ्यांची किल्ले रायगडावर कूच,हिंदवी स्वराज्याच्या राजधानीत पोवाडे

आज शिवराज्याभिषेक दिन सोहळा; हजारो मावळ्यांची किल्ले रायगडावर कूच,हिंदवी स्वराज्याच्या राजधानीत पोवाडे

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 351 वा राज्याभिषेक दिन सोहळा तारखेनुसार उद्या शुक्रवारी किल्ले रायगडावर भगव्या उत्साहात पार पडणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो मावळ्यांनी रायगडावर कूच केले आहे. राज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला राजमाता जिजाऊ यांच्या पाचाड येथील समाधीला शिवभक्तांनी अभिवादन केले. आजपासूनच हिंदवी स्वराज्याच्या राजधानीत पोवाड्यांचा निनाद घुमू लागला असून शिवस्तुतीने डफ कडाडले आहेत. राज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्ताने किल्ले रायगडावर उद्या शिवकाळ अवतरणार आहे.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती आणि दुर्गराज रायगड यांच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘जागर शौर्य भक्ती’चा हा अनोखा कार्यक्रमही होणार असून आज दुपारपासूनच रायगड किल्ला छत्रपतींच्या जयजयकाराने दुमदुमून गेला. नगारखाना येथे विधिवत गडपूजन करण्यात आले. त्याशिवाय ‘धार तलवारीची… युद्धकला महाराष्ट्राची’ या उपक्रमांतर्गत होळीच्या माळावर युद्धाचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. संध्याकाळच्या सुमारास ढोलताशांचा गजर आणि लेझीमची प्रात्यक्षिके मोठ्या उत्साहात करण्यात आली.

सुवर्ण नाण्यांचा अभिषेक होणार
या सोहळ्यासाठी संभाजी राजे छत्रपती यांच्या उपस्थितीत उद्या सकाळी सात वाजता नगारखाना येथे ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर सकाळी ९.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसदरेवरील सिंहासनारूढ पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक होईल.

अवजड वाहतुकीस बंदी
शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पाश्र्वभूमीवर होणारी गदीं लक्षात घेऊन पाचाड ते रायगड किल्ला यादरम्यान अवजड वाहनांना जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांनी बंदी घातली आहे. त्यामुळे शिवभक्तांचा मार्ग सुकर होणार आहे.

रोह्यातील शिवसृष्टीचे आज लोकार्पण
शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून रोह्यात उभारलेल्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण उद्या शुक्रवारी होणार आहे. कुंडलिका नदीच्या काठावर ही शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. यासाठी ३ कोटी २३ लाख रुपयांचा खर्च आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;