जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे आज उद्घाटन

जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे आज उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी जम्मू-कश्मीर दौऱ्यात 46 हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. त्यात चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचा समावेश आहे. पंतप्रधान सकाळी 11 वाजता चिनाब पुलाचे उदघाटन करणार असून नंतर कटरा ते श्रीनगरदरम्यान दोन ‘वंदे भारत’ एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

चिनाब नदीवर बांधलेला पूल हा हिंदुस्थानातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल आहे. हा पूल 1.3 किमी लांबीचा आणि 359 मीटर उंचीचा आहे. हा पूल पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच आहे. 260 किमी प्रतितास वेगाने येणाऱ्या वाऱ्यात तसेच भूकंपाच्या झोन-5 मध्येही पूल स्थिर राहू शकतो. पूलाच्या बांधकामात 30,000 टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. सुमारे 1500 कोटी रुपये खर्चून बांधलेला हा पूल हिंदुस्थानच्या अभियांत्रिकी शक्तीचे प्रतिक मानला जात आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचेही लोकार्पण केले जाणार आहे. या रेल्वे लिंकची लांबी 272 किमी असून त्यावर 43,780 कोटी रुपये खर्च केला आहे. त्यात 36 बोगदे व 943 पूल समाविष्ट आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;