आधी पार्किंग धोरण राबवा, मग टोईंगचे नाटक करा! ठाणेकरांवर बेकायदा लादलेल्या ‘जिझिया’ ला शिवसेनेचा विरोध, वाहतूक शाखेला निवेदन

आधी पार्किंग धोरण राबवा, मग टोईंगचे नाटक करा! ठाणेकरांवर बेकायदा लादलेल्या ‘जिझिया’ ला शिवसेनेचा विरोध, वाहतूक शाखेला निवेदन

गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेल्या वाहनांच्या उचलेगिरीला ठाणेकरांनी कडाडून विरोध करण्यास सुरुवात केली आहे. ठाणे वाहतूक शाखेने पुन्हा सुरू केलेल्या टोईंग व्हॅनविरोधात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असताना बेकायदा लादलेल्या ‘जिझिया’ ला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज विरोध केला आहे. आधी पार्किंग धोरण राबवा, मग टोईंगचे नाटक करा, अशी आग्रही मागणी करत शिष्टमंडळाने वाहतूक शाखेला निवेदन दिले.

ठाण्याच्या रस्ते, फुटपाथवर बेकायदा पद्धतीने वाहने पार्क करणाऱ्या वाहनांना टोईंग करणारी यंत्रणा गेल्या सहा महिन्यांपासून बंद होती. वाहने टोईंगमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, टोईंग कर्मचाऱ्यांचा अरेरावी आणि गुंडगिरीचा नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारीमुळे ही सेवा बंद करण्यात आली होती. दरम्यान चार दिवसांपूर्वी टोईंग व्हॅन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला. त्यानुसार टोईंग व्हॅनची चाचणी घेण्यात आली. मात्र ही प्रक्रिया कायदेशीर नसल्याने ठाणेकरांनी विरोध केल्यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाठ यांची भेट घेत टोईंग व्हॅनला विरोध केला.

यावेळी शहरप्रमुख प्रदीप शिंदे, उपशहरप्रमुख सचिन चव्हाण, प्रदीप शेडगे, रामभाऊ रेपाळे, परिवहन माजी सदस्य राजेंद्र महाडिक, प्रतीक राणे, प्रशांत सातपुते, विजय हंडोरे, रमेश शिर्के, संजय भोई, संजय भिसे, राजू मोरे, राजू शिरोडकर, महिला उपजिल्हाप्रमुख आकांक्षा राणे, शहर संघटक प्रमिला भांगे, विद्या कदम, अनिता प्रभू, सुनंदा देशपांडे, उषा बोराडे, सविता धुमाळ, रसिका सुभेदार, अपर्णा भोईर, पौर्णिमा लाड, आरती मोरे आदी उपस्थित होते.

उपायुक्तांवर प्रश्नाचा भडीमार

टोईंग व्हॅन टेंडर प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली का, अशा अनेक प्रश्नाचा भडीमार यावेळी शिवसैनिकांनी केला. त्यावेळी उपायुक्त पंकज शिरसाट यांच्याकडे कोणतेही उत्तर नसल्याचे दिसून आले. दरम्यान आम्ही मुदतवाढ दिलेली आहे, असे कारण पुढे करून चालढकल केल्याचे निष्पन्न झाले असल्याने शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;