Health Tips- मुखशुद्धीसाठी तसेच रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी मसाल्याच्या डब्यातील हा पदार्थ आहे खूप महत्त्वाचा! वाचा सविस्तर

Health Tips- मुखशुद्धीसाठी तसेच रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी मसाल्याच्या डब्यातील हा पदार्थ आहे खूप महत्त्वाचा! वाचा सविस्तर

हिंदुस्थानी स्वयंपाकघरात केवळ पदार्थ शिजत नाहीत, तर इथे आरोग्याचे अनेक नुस्खे देखील सापडतात. आपल्या आपल्या स्वयंपाकघरातील अनेक गरम मसाले हे आरोग्यासाठी वरदान मानले गेले आहेत. पण आपण वापरत असलेल्या अनेक मसाल्यांचा नेमका उपयोग काय हेच आपल्याला माहीत नसते. पूर्वीच्या काळी गरम मसाल्यांचा उपयोग हा औषधांसाठी सहजपणे केला जायचा. असाच मसाल्यातील एक महत्त्वाचा मसाला म्हणजे, वेलची. आपल्या स्वयंपाकघरात तुम्हाला वेलची सहज मिळेल. छोटी वेलची तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवते. रक्तदाब संतुलित ठेवण्यासाठी हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी देखील वेलची खूप फायदेशीर आहे.

वेलचीचे आपल्या आरोग्यासाठी फायदे

वेलचीमध्ये कार्बोहायड्रेट्स, आहारातील फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस सारखी खनिजे असतात. अशा परिस्थितीत उच्च रक्तदाब असलेल्यांनी त्यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.

वेलचीमध्ये असलेले कॅल्शियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांसारखी खनिजे रक्तदाब नियंत्रित करण्यात मोठी भूमिका बजावतात. चयापचय गतिमान करण्यासाठी वेलचीचे सेवन देखील खूप फायदेशीर आहे.

रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी, आपण आपल्या आहारात वेलचीचा समावेश केला पाहिजे. वेलची खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. म्हणजेच ते खाल्ल्याने तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

 

Benefits Of Clove Oil- लवंग तेल दातदुखी, केसांच्या वाढीसाठी आहे वरदान! वाचा लवंग तेलाचे सविस्तर फायदे

ज्या लोकांना वेळेवर झोप येत नाही किंवा झोप कमी होण्याची समस्या आहे त्यांनी वेलचीचे सेवन जरूर करावे.

 

वेलची माऊथ फ्रेशनर म्हणून काम करते. आपण वेलची थेट चावून खाऊ शकतो. याशिवाय आपण चहामध्ये वेलचीचे सेवन करू शकतो.

(कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

इंस्टाग्रामने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मिशा अग्रवालचा जीव घेतला? आत्महत्या की हत्या? मृत्यूचे धक्कादायक कारण समोर इंस्टाग्रामने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मिशा अग्रवालचा जीव घेतला? आत्महत्या की हत्या? मृत्यूचे धक्कादायक कारण समोर
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मीशा अग्रवालने 24 एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला. तिच्या कुटुंबीयांकडूनच याबाबतची माहिती सांगण्यात आली. पण तिच्या मृत्यूचे...
पहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांना धक्का बसला? पाळलं मौन, 8 दिवसांपासून करतायत फक्त ‘या’ गोष्टी
‘लग्नानंतर माझी रात्रीची झोप उडाली होती’, माधुरी दीक्षिने सांगितला डॉ. नेनेंसोबतचा लग्नानंतरचा अनुभव
पीक विमा योजनेतील नवा ‘फडणवीस विमा पॅटर्न’ शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक: हर्षवर्धन सपकाळ
Caste Census देशात जातीनिहाय जनगणना होणार, विरोधकांच्या मागणीला यश
Intel कंपनी 20 टक्के कर्मचाऱ्यांना देणार नारळ, सीईओ लिप बू टॅन यांनी लिहिले पत्र
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी हाफिज सईदचा लाहोरमधील सिक्रेट ठिकाणा उघड!