नरेंद्र मोदींनी सांगावे की ट्रम्प खोटं बोलतायत, राहुल गांधी यांचे आव्हान

नरेंद्र मोदींनी सांगावे की ट्रम्प खोटं बोलतायत, राहुल गांधी यांचे आव्हान

अमेरिकेच्या मध्यस्थीमुळेच हिंदुस्थान आणि पाकिस्तानात शस्त्रसंधी झाली. आपल्यामुळेच दोन्ही देशांमधील सशस्त्र संघर्ष थांबला, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने करत आहेत. ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादमिर पुतिन यांच्याकडे देखील याचा पुरुच्चार केला आहे. त्यावरून आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी यावरून भाजपला फटकारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक आव्हान दिले आहे.

”अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 11 वेळा एकच गोष्ट सांगितली आहे. ते प्रत्येक वेळी हेच म्हणाले की मोदीजींवर मी दबाव टाकल्यानंतर युद्धबंदी झाली. नरेंद्र मोदींनी यावर एकदाही प्रतिक्रिया दिली नाही. मी मोदीजींनी एकदा तरी सांगावं की ट्रम्प खोटं बोलत आहेत, असे आव्हान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.

बिहार क्राईम कॅपिटल ऑफ इंडिया, राहुल गांधींची नितीशकुमारांवर टीका

नालंदामध्ये विद्यापीठ होते. जगभरातून लोक या विद्यापीठात येत होते. पण आज उलट परिस्थिती आहे. बिहारचे नागरिक इतर राज्यात आणि जगभरात जात आहेत, कारण इथे रोजगार नाही, अशा शब्दांत लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर टीका केली. बिहारमधील राजगीर येथे आयोजित ‘संविधान सुरक्षा संमेलन’मध्ये राहुल गांधी यांनी नागरिकांशी संवाद साधला.

बिहार कुठे होते आणि आता कुठे पोहोचले आहे. आज जपान, कोरिया, चीनची चर्चा होते. मात्र, त्यांचा जी विचारसरणी आहे ती कुठून आली? ती तुम्ही दिली आहे. बिहारमधून कुवेत, श्रीलंका, कोरिया, जपानमध्ये विचार गेले, याला म्हणतात बिहार, असे राहुल गांधी म्हणाले. तुम्ही नाही तुमचे सरकार हे सर्वकाही विसरले आहे. बिहारला क्राईम कॅपिटल बनवले आहे, अशी सडकून टीका राहुल गांधी यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पिंपरी-चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेच्या पाठपुराव्याला यश पिंपरी-चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांकडून ओला कचरा उचलण्यास नकार देणाऱ्या निर्णयाला अखेर मवाळ भूमिका घेत, ओला कचरा पूर्ववत उचलण्याचा निर्णय...
‘‘ॲल्युमिनिअम मॅन ऑफ इंडिया’’ उद्योजक भरत गीते यांना ‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण’’ पुरस्कार!
मोठ्या प्रकल्पांपेक्षा मूलभूत सुविधा सोडविण्यावर भर द्या : खासदार श्रीरंग बारणे 
नागरिकांच्या आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उभारण्यावर भर : महापौर रवि लांडगे
पिंपरी-चिंचवडमध्ये उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे १००० वृक्षांचे वाटप
Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच