बार्शीत भाजपच्या माजी आमदाराच्या मुलाची दादागिरी; माना मुरगाळण्याची धमकी!

बार्शीत भाजपच्या माजी आमदाराच्या मुलाची दादागिरी; माना मुरगाळण्याची धमकी!

भाजप महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत आहे. बार्शीत भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचा मुलगा रणवीरने भररस्त्यात दादागिरी केली. रणवीरने विरोधी पक्षाच्या कार्यकत्याला माना मुरगाळीन… अशी धमकी दिली आहे. या संबंधीचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यात शिवसेना आमदार दिलीप सोपल व बारबोले यांच्याविषयीही रणवीरने अपशब्द वापरल्याचे दिसत आहे.

माजी आमदार राजेंद्र राऊत यांचा मुलगा व भाजपाचा पदाधिकारी असलेल्या रणवीर राऊत याने भररस्त्यात गाडीला ओव्हरटेक केल्याचा राग मनात धरून विरोधी पक्षाच्या एका कार्यकर्त्याला समर्थकासह शिवीगाळ केली. या कार्यकर्त्याला दमबाजी करताना रणवीर राऊत याने शिवीगाळ केली व विरोधात गेल्यास माना मुरगाळीन, वाकड पाऊल टाकला तर होत्याचे नव्हते करेन, नीट राहायचे या भाषेत दमबाजी केली आहे.

दरम्यान, यावेळी रणवीर राऊत याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार दिलीप सोपल व बारबोले यांच्याविषयीही अपशब्द वापरले आहेत. रणवीर राऊतचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत असून, संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;