नवी मुंबईत 27 कामगारांना वायुबाधा, ‘स्वास्थ्य अ‍ॅग्रो’मध्ये गॅसगळती; 15 महिलांचा समावेश

नवी मुंबईत 27 कामगारांना वायुबाधा, ‘स्वास्थ्य अ‍ॅग्रो’मध्ये गॅसगळती; 15 महिलांचा समावेश

खाद्य पदार्थांची पॅकिंग आणि रुग्णालयांसाठी लागणारे गॅस सिलिंडर भरणाऱ्या तुर्भे एमआयडीसीतील स्वास्थ्य अ‍ॅग्रो एंटरप्राईजेस या कंपनीत आज गॅस गळती झाली. त्यामुळे कंपनीत काम करणाऱ्या 27 कामगारांना त्रास झाला. काही कामगार बेशुद्ध पडल्याने व्यवस्थापनाची एकच पळापळ उडाली. सर्वच कामगारांना वाशी येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चौघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. वायुबाधा झालेल्या कामगारांमध्ये 15 महिलांचाही समावेश आहे.

तुर्भे एमआयडीसीमधील भूखंड क्रमांक डी-326 वर उभारलेल्या स्वास्थ्य अ‍ॅग्रो एंटरप्राईजेस या कंपनीमध्ये खाद्य पदार्थांचे पॅकिंग केले जाते. काही भागात रुग्णालयांसाठी आवश्यक असलेल्या गॅसचे सिलिंडर भरण्याचेही काम होते. आज नेहमीप्रमाणे हे काम सुरू असताना दुपारी अचानक वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर व्यवस्थापनाने जनरेटर सुरू केले. त्यामुळे यंत्रणेत बिघाड झाल्याने कंपनीत कार्बन मोनॉक्साईड या विषारी वायूची गळती झाली. त्यावेळी कंपनीत 27 कामगार काम करीत होते. त्यांना अचानक त्रास होऊ लागला. उग्रवासामुळे काही कामगार बेशुद्ध पडले. हा प्रकार व्यवस्थापनाच्या निदर्शनास आल्यानंतर जनरेटर तातडीने बंद करण्यात आले. वायुबाधा झालेल्या सर्वच कामगारांना तातडीने वाशी येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले. चार कामगारांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

कामगारांच्या कुटुंबीयांची पळापळ
स्वास्थ्य अ‍ॅग्रो एंटरप्राईजेस या कंपनीमध्ये गॅस गळतीचा प्रकार घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली, तर कामगारांच्या नातेवाईकांची आणि कुटुंबीयांची धावपळ झाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख महेश कोटीवाले यांनी शिवसैनिकांसह तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली. दरम्यान या कंपनीत बेकायदा पद्धतीने काम सुरू होते. त्यामुळेच हा प्रकार घडला असल्याने कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शहरप्रमुख महेश कोटीवाले यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;