‘काँटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे वयाच्या 42 व्या वर्षी निधन

‘काँटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे वयाच्या 42 व्या वर्षी निधन

‘काँटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे शुक्रवारी रात्री उशिरा निधन झाले. ती 42 वर्षांची होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेफालीच्या रात्री 11 वाजता छातीत दुखू लागले. यानंतर तिच्या पतीने तिला तात्काळ अंधेरीतील बेलेव्ह्यू रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शेफालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. ज्येष्ठ चित्रपट समीक्षक विकी लालवाणी यांनी आपल्या इंस्टाग्राम पेजवर शेफालीच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.

शेफालीचा जन्म अहमदाबादमध्ये झाला होता. 2002 मध्ये तिने आशा पारेख यांच्या चित्रपटातील ‘काँटा लगा’ या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ रिक्रिएट केला. या गाण्याला खूप लोकप्रियता मिळाली. या गाण्यानंतर शेफालीला ‘कांता लगा गर्ल’ म्हटले जाऊ लागले. शेफाली सध्या पतीसह अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये वास्तव्यास होती. तिच्या अचानक मृत्यूमुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;