जनतेला आश्वासनांचं गाजर देणार्‍या सरकारचा गाजरांचा हाल घालून सत्कार! रोहिणी खडसेंचा महायुतीवर निशाणा

जनतेला आश्वासनांचं गाजर देणार्‍या सरकारचा गाजरांचा हाल घालून सत्कार! रोहिणी खडसेंचा महायुतीवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी शनिवारी पावसाळी अधिवेशनाच्या पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सरकारने जनतेला केवळ आश्वासनांचे गाजर दाखवले अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली. यावेळी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे-अजित पवार यांच्या प्रतिमेला गाजरांचा हार घातला.

हे सरकार येऊन सहा महिन्यांच्यावर काळ उलटला आहे. मात्र सरकार विधानसभा निवडणुकीच्या काळात दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. सरकारने ना शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, ना त्यांच्या पिकाला हमीभाव दिला, ना लाडक्या बहिणींना 2100 रुपये या सरकारने दिली ती फक्त ‘गाजरे’. म्हणून गाजरांचा हार घालून सरकार या सरकारचा सत्कार केला, असे रोहिणी खडसे यावेळी म्हणाल्या.

यावेळी रोहिणी खडसे यांनी एक फोटोही दाखवला. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला डाव्या बाजूला अजित पवार, सुनील तटकरे, तर उजव्या बाजुला अशोक चव्हाण, नारायण राणे, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल बसलेले दिसत आहेत. या सर्व नेत्यांवर भाजपनेच भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत त्यांना तुरुंगात चक्की पिसायला पाठवणार अशी प्रतिज्ञा घेतली होती. मात्र आज हे सर्व नेते ताठ मानाने फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसले आहेत. याचाही रोहिणी खडसे यांनी समाचार घेतला.

झारीतील शुक्राचार्य कोण? पबला कोणाचा आशीर्वाद? खासदाराचा भाजपला घरचा आहेर

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;