धुळे शासकीय विश्रामगृहातील कॅशकांड, दखलपात्र गुन्हा नोंदवण्याचे आदेश

धुळे शासकीय विश्रामगृहातील कॅशकांड, दखलपात्र गुन्हा नोंदवण्याचे आदेश

धुळे शहरातील शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या 1 कोटी 84 लाख 84 हजार 200 रुपयांच्या कॅश प्रकरणी पोलीस प्रशासनाने दखलपात्र गुह्याची नोंद करून तसा अहवाल न्यायालयास सादर करावा. तसेच गुह्याशी संबंधित कागदपत्रांची एक प्रतदेखील अहवालासोबत सादर करावी, असा आदेश धुळे जिल्हा न्यायालयातील मुख्य न्याय दंडाधिकारी के. बी. चौगुले यांनी दिला आहे, अशी माहिती तक्रार करणारे माजी आमदार अनिल गोटे यांनी आज प्रसार माध्यमांना दिली.

शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या पैशांचा तपास करण्यात प्रथमदर्शनी पोलिसांनी दिरंगाई केली तसेच गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. गुन्हा दाखल करताना तो अदखलपात्र गुन्हा दाखल करून योग्य पद्धतीने तपास केला नाही, असेही अनिल गोटे यांनी न्यायालयात केलेल्या तक्रारीत म्हटले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;