कामाठीपुराचा चेहरामोहरा बदलणार, पुनर्विकासासाठी दोन विकासक इच्छुक; 8 हजार रहिवाशांना मिळणार प्रशस्त घरे

कामाठीपुराचा चेहरामोहरा बदलणार, पुनर्विकासासाठी दोन विकासक इच्छुक; 8 हजार रहिवाशांना मिळणार प्रशस्त घरे

दक्षिण मुंबईतील 34 एकर जागेवर वसलेल्या कामाठीपुराचा चेहरामोहरा बदलणार आहे. कामाठीपुराचा पुनर्विकास करण्यासाठी रेमंड रियालिटी आणि अशदान प्रॉपर्टीज प्रा. लि. हे दोन विकासक इच्छुक असून, शुक्रवारी म्हाडा मुख्यालयात झालेल्या निविदापूर्व बैठकीत त्यांनी सहभाग घेतला. कामाठीपुराच्या पुनर्विकासातून 8001 रहिवाशांना प्रत्येकी 500 चौरस फुटांचे हक्काचे घर मिळणार असून 800 जमीनमालकांनाही योग्य मोबदला दिला जाणार आहे.

दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा येथील 1 ते 15 या गल्ल्यांमध्ये सुमारे 943 उपकरप्राप्त इमारती आहेत. यामध्ये सुमारे 6625 निवासी व 1376 अनिवासी असे एकूण 8001 रहिवासी वास्तव्यास असून 800 जमीनमालक आहेत. या क्षेत्रातील इमारती 100 वर्षे जुन्या आहेत. संपूर्ण विभागातील भूखंडाचे क्षेत्रफळ सुमारे 73,144.84 चौरस मीटर आहे. या भागातील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त व बिगर उपकरप्राप्त इमारतींचा व भूखंडांचा एकत्रितरीत्या समूह पुनर्विकास हा विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034, विनियम 33 (9) अंतर्गत म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत केला जाणार आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी नियुक्त करण्यासाठी म्हाडाने 12 जून रोजी निविदा जाहीर केली होती.

म्हाडाला लॉटरीसाठी घरे मिळणार

या प्रकल्पाच्या माध्यमातून म्हाडाला 44 हजार चौ. मी. क्षेत्र निविदाधारकांमार्फत उपलब्ध होणार असून मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हाडाला मोठय़ा प्रमाणात गृहसाठा उपलब्ध होणार आहे. तसेच विकासकाला 5,67,000 चौ. मी. क्षेत्र उपलब्ध होणार असून अंदाजे 4500 घरे उपलब्ध होणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Shefali Jariwala Death Reason : शेफालीचा मृत्यू, या 5 कारणामुळे येऊ शकतो कार्डियाक अरेस्ट Shefali Jariwala Death Reason : शेफालीचा मृत्यू, या 5 कारणामुळे येऊ शकतो कार्डियाक अरेस्ट
Shefali Jariwala Death Reason : प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे वयाच्या 42 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शेफालीच्या निधनाने...
विंडीजच्या स्टार क्रिकेटपटूवर बलात्काराचा आरोप, गयानातील 11 पीडित महिला आल्या समोर
मराठी संपवण्यासाठी मोदी-शहांनी हिंदी सक्ती लादली अन् फडणवीस-शिंदे सरकारनं GR काढला! – संजय राऊत
ठाण्यातील सुप्रसिद्ध छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर वसंतराव मोडक यांचे निधन
अमेरिका इराणला 30 अब्ज डॉलर्स देण्याचे वृत्त सपशेल खोटे आणि मूर्खपणाचे; ट्रम्प सोशल मीडियावर संतापले
भारतीय हवाई दलात अग्निवीर वायुभरती
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या पीएफची रक्कम