Jeff Bezos-Lauren Sanchez – 427 कोटींचा खर्च, नवरीचे 27 ड्रेस, 97 विमानं अन् शुभमंगल सावधान! जगातील सर्वात महाग लग्न इटलीत पडलं पार

Jeff Bezos-Lauren Sanchez – 427 कोटींचा खर्च, नवरीचे 27 ड्रेस, 97 विमानं अन् शुभमंगल सावधान! जगातील सर्वात महाग लग्न इटलीत पडलं पार

ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत समावेश असलेले जेफ बेजोस लग्नबंधनात अडकले आहेत. 61 वर्षीय जेफ बेजोस यांनी 55 वर्षीय प्रेयसी लॉरेन सांचेझसोबत शुक्रवारी इटलीमध्ये लग्नगाठ बांधली. हा लग्नसोहळा तीन दिवस चालला होता. या सोहळ्याला 200 हून अधिक व्हीआयपी पाहुणे उपस्थित होते. लॉरेन सांचेझ यांनी लग्नाचा फोटोही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

इटलीतील व्हेनिस येथे जेफ बेजोस आणि पत्रकार लॉरेन सांचेझ यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. लग्न सोहळण्यात लॉरेन हिने पांढराय रंगाचा गाऊन घातला होता, तर जेफ बेजोस यांनी क्लासिक सूट घातला होता.

सॅन जॉर्जिओ मॅगिओरच्या बेटावर हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. पाहुण्यांना येथे आणण्यासाठी विशेष विमानं आणि मोटार बोटींची व्यवस्था करण्यात आली होती.

या राजेशाही लग्नाला उद्योग, राजकारण, सिनेसृष्टी, क्रीडा जगतातील हाय प्रोफाईल लोक उपस्थित होते. अभिनेत्री किम कार्दशियन, क्लॉई कार्दशियन, ओपरा विन्फ्रे, ऑरलँडो ब्लूम, ओप्रा विन्फ्रे, बॅरी डिलर, लिओनार्डो डिकॅप्रियो यांच्यासह फुटबॉल खेळाडू टॉम ब्रँडी, फॅशन डिझायनर स्पेन्सर अँटल, गायक अशर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका आणि तिचे पती जेरेड कुशनर उपस्थित होते.

हे जगातील सर्वात महाग लग्न होते. या लग्नासाठी 427 कोटी रुपये खर्च करण्यात आले. तसेच कोट्यवधी रुपयांचे दानही करण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;