आमच्या क्षेपणास्त्रांचा वर्षाव होताच इस्रायल ‘डॅडीं’कडे पळाला! इराणचा नेत्यानाहूंना टोला

आमच्या क्षेपणास्त्रांचा वर्षाव होताच इस्रायल ‘डॅडीं’कडे पळाला! इराणचा नेत्यानाहूंना टोला

इराण-इस्रायल यांच्यातील युद्ध संपले असले तरी त्यांच्यातील संघर्ष सुरूच आहे. आता इराणने पुन्हा एकदा इस्रायलला डिवचणारे विधान केले असून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांना टोला लगावला आहे. इराणच्या क्षेपणास्त्रांचा इस्रायलवर वर्षाव होत होता. तेव्हा त्यांच्याकडे ‘डॅडीं’कडे पळावे लागले. नाटो शिखर परिषदेदरम्यान नाटो प्रमुखांनी ट्रम्प यांना ‘डॅडी’ असे संबोधले. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या नवीन टोपणनावाचा उल्लेख करून इस्रायलवर टीका केली आहे. अब्बास अराघची म्हणाले की इराणी क्षेपणास्त्रांपासून बचावासाठी इस्रायलकडे ‘डॅडीं’कडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता.

याबाबत त्यांनी पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, अमेरिका इराणशी अणुकरार करण्याबाबत गंभीर असेल, तर त्यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य टाळावे. यावेळी त्यांनी इस्रायलला इशारा दिला की इराण आपली खरी शक्ती उघड करण्यास मागेपुढे पाहणार नाही. इस्रायली राजवटीला आमच्या क्षेपणास्त्रांपासून वाचण्यासाठी ‘डॅडी’कडे पळून जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. हे आता जगाला समजले आहे. तसेच शक्तिशाली इराणी लोक धमक्या आणि अपमान सहन करत नाहीत, हेदेखील जगाला समजले आहे. गरज भासल्यास इराण आपली खरी क्षमता उघड करण्यास मागेपुढे पाहणार नाही आणि इराणच्या सामर्थ्याबद्दलचे गैरसमज संपतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

नेदरलँड्समध्ये नुकत्याच झालेल्या नाटो शिखर परिषदेदरम्यान नाटोचे सरचिटणीस मार्क रुटे यांनी ट्रम्प यांचा डॅडी असा उल्लेख केला. याच वक्तव्याचा संदर्भ घेत इराणने इस्रायलला पुन्हा एकदा डिवचले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;