मेसेज वाचणं होणार एकदम सोपं,व्हॉट्सअ‍ॅपनं आणलं नवीन एआय फीचर

मेसेज वाचणं होणार एकदम सोपं,व्हॉट्सअ‍ॅपनं आणलं नवीन एआय फीचर

व्हॉट्सअॅपने एआय फीचर लाँच केले आहे. फीचरचे नाव ‘एआय समराईज’ असे आहे. नव्या फीचरमुळे आता युजर्संना अनेक मेसेज एका छोटय़ा सारांशाच्या माध्यमातून पटकन समजून वाचता येणार आहेत. यामुळे व्हॉट्सअॅपवरील संवाद आणखी वेगवान आणि सुलभ होणार आहे. व्हॉट्सअॅपचे ‘मेसेज समरीज’ हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चालणारं फीचर आहे. याच्या मदतीने, युजर्संना त्यांच्या चॅटमधील न वाचलेले अनेक मेसेज एकाच वेळी एका छोटय़ा सारांशात वाचता येतात. म्हणजेच प्रत्येक मेसेज वेगळा वाचण्याची गरज नाही. एआय तुमच्यासाठी मुख्य मुद्दे आणि माहिती एका क्लिकमध्ये समोर दाखवणार आहे. हे विशेषतः त्या वेळी उपयुक्त ठरतं, जेव्हा तुम्ही मीटिंग, प्रवास किंवा कामामुळे अनेक मेसेज मिस करता आणि नंतर एकदम खूप मेसेज येतात.

फीचर कसे वापरायचे…

हे फीचर बाय डिफॉल्ट ऑक्टिव्हेट केलेले नाही. युजर्सला आपल्या गरजेनुसार व्हॉट्सअॅपचे हे नवीन फीचर ऑन किंवा ऑफ करता येईल. अॅडव्हान्स चॅट प्रायव्हसी सेटिंगद्वारे कोणत्या चॅटसाठी एआय सारांश मिळवायचा हेही ठरवता येतं. त्यामुळे संवेदनशील किंवा खासगी चॅट्स एआय सारांशातून वगळता येतात.

 सध्या अमेरिकेतील युजर्संसाठी ‘मेसेज समरीज’ फीचर सुरू करण्यात आलंय. लवकरच हे फीचर इतर देश आणि भाषांमध्येदेखील उपलब्ध होणार आहे, असे मेटाने सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;