…तर इराणवर पुन्हा हल्ला करण्यास मागेपुढे पाहणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

…तर इराणवर पुन्हा हल्ला करण्यास मागेपुढे पाहणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

इराण-इस्रायल युद्धामुळे मध्यपूर्वेत तणाव निर्माण झाला होता. दोन्ही देशांनी अत्याधुनिक हत्यारांनी एकमेकांवर हल्ला केला. अमेरिकेनेही यात उडी घेतली होती. मात्र 12 दिवसानंतर हा संघर्ष थांबला आणि युद्धविरामाची घोषणा झाली. युद्धादरम्यान इराणने इस्रायल आणि अमेरिका या दोन्ही देशांना आपली ताकद दाखवून दिली. आता युद्धविराम झाला असला तरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची युद्धाची खुमखुमी कमी झालेली नाही. शुक्रवारी व्हाईट व्हाऊसमध्ये माध्यमांना संबोधित करताना त्यांनी गरज पडल्यास इराणवर पुन्हा हल्ला करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे म्हटले. त्यामुळे हा युद्धविराम किती दिवस लांबेल हा प्रश्नच आहे.

अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणचे आण्विक तळ पूर्णपणे नष्ट झाल्याचे पुनरुल्लेख डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. अमेरिकेने इराणचे आण्विक तळ नष्ट केले. लक्ष्याचा आम्ही अचूक भेद केला. इतर दोन ठिकाणीही आम्ही हल्ला केला. या हल्ल्यातून सावरून ते नजीकच्या काळात अण्वस्र बनवू शकतील असे वाटत नाही. या आण्विक तळांवर त्यांनी एक ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त खर्च केले होते. हे खुप धोकादायक होते आणि आम्ही ते नष्ट केले. तिथे सीमेंट-काँक्रीटच्या ढिगाऱ्याखाली असणारे सर्वकाही नष्ट झाले, असे म्हणत ट्रम्प यांनी इराणचे आण्विक तळ सुरक्षित असल्याचा दावा फेटाळून लावला.

ते पुढे म्हणाले की, गरज पडली तर इराणवर पुन्हा हल्ला करण्यास मागेपुढे पाहणार नाही. जर भविष्यात इराणने संवेदनशील कारवाया पुन्हा सुरू केल्या तर अमेरिका पुन्हा हल्ला करू शकते. इराणने युरेनियम त्या पातळीपर्यंत (अण्वस्र निर्मिती) नेले तर हा अमेरिकेसाठी चिंतेचा विषय असेल.

इराणचा इस्रायल, अमेरिकेला चकवा! कोणालाच थांगपत्ता लागला नाही अन् गुप्त अण्वस्त्र तळ तयार झाला

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनी यांनी केलेल्या विधानांना लवकरच उत्तर देईल, असेही ते एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले. युद्धविरामानंतर खामेनी यांनी देशाला संबोधित करताना अमेरिका आणि इस्रायलवर हल्ला करत विजय मिळवल्याचे म्हटले होते. तसेच इराणने अमेरिकेचे थोबाड फोडल्याचेही ते म्हणाले होते.

आम्ही अमेरिकेचे थोबाड फोडले! खामेनी कडाडले

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;