अहमदाबाद दुर्घटनेनंतर जल्लोषाचा व्हिडीओ व्हायरल; AISATS ने 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांना केले बडतर्फ

अहमदाबाद दुर्घटनेनंतर जल्लोषाचा व्हिडीओ व्हायरल; AISATS ने 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांना केले बडतर्फ

अहमदाबाद विमान अपघातानंतर काही दिवसांनी AISATS च्या ऑफिसमध्ये झालेल्या जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या घटनेबाबत एअर इंडिया SATS सर्व्हिसेस (AISATS) ने दु:ख व्यक्त केले आहे. तसेच कंपनीने या घटनेला गांभीर्याने घेत चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना बडतर्फ केले.

एअर इंडिया आणि सिंगापूरच्या SATS लिमिटेडची ग्राउंड हँडलिंग जॉइंट व्हेंचर कंपनी AISATS ही आहे. अलिकडेच, त्यांच्या कर्मचाऱ्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ते ऑफिसमध्ये नाचताना, गाताना आणि जल्लोष करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ 12 जून रोजी एअर इंडिया एआय 171 अपघातानंतर काही दिवसांनी रेकॉर्ड करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, कंपनीकडून व्हिडिओची तारीख स्पष्ट केलेली नाही. असे सांगण्यात येते की तो व्हिडीओ 12 जूनच्या अपघातानंतर काही दिवसांनी शूट करण्यात आला होता.

याबाबत AISATS ने शुक्रवारी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, एआय 171 अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्या कुटुंबियांसोबत आम्ही उभे आहोत आणि दुर्घटनेबाबत तीव्र शोक व्यक्त करतो. अलीकडेच व्हायरल झालेल्या अंतर्गत व्हिडिओबद्दल आम्हाला खेद आहे. हे वर्तन आमच्या मूल्यांशी सुसंगत नाही. आम्ही जबाबदार असलेल्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. आम्ही संवेदनशीलता, व्यावसायिक दृष्टिकोन आणि जबाबदारी या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो.

कंपनीने स्पष्ट केले की ऑफिस पार्टी आयोजित करण्यात थेट सहभागी असलेल्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ प्रभावाने नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. 12 जून रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडिया एआय 171 विमान अपघात झाला होता. त्यात 270 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर करण्यात आलेल्या जल्लोषाबाबत कंपनीने खेद व्यक्त केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;