Saquib Nachan – मुंबईतील दोन बॉम्बस्फोटातील आरोपी साकीब नाचनचा मृत्यू

Saquib Nachan – मुंबईतील दोन बॉम्बस्फोटातील आरोपी साकीब नाचनचा मृत्यू

मुंबईतील दोन बॉम्बस्फोट आणि इसिस दहशतवादी मॉड्युल प्रकरणातील साकीब नाचनचा शनिवारी मृत्यू झाला. साकीबला सोमवारी ब्रेन स्ट्रोक आला. त्यामुळे त्याला उपचारासाठी दिल्लीतील दीनदयाळ रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मत्यू झाला. साकीबच्या मृत्यूचे वृत्त धडकताच भिवंडी पडघ्यातील बोरीवली गावात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

साकीब हा सिमी या बंदी घातलेल्या संघटनेचा माजी पदाधिकारी होता. तसेच मुंबईतील बॉम्बस्फोटासह दिल्ली-पडघा इसिस दहशतवादी मॉड्युल प्रकरणातील प्रमुख आरोपी होता. इसिसशी संबंधित सदस्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली नाचन याची चौकशी सुरू होती. नाचन तिहार तुरुंगात शिक्षा भोगत होता. सोमवारी त्याला ब्रेन स्ट्रोक आल्याने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

भिवंडीतील पडघा येथील बोरिवली गावातील रहिवासी होता. साकिब नाचन हा सुरुवातीला सिमीचा कार्यकर्ता म्हणून काम करत होता. त्यानंतर तो सिमी चा पहिला अध्यक्ष बनला. 2002 च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटात साकिब नाचन याला दहा वर्षांची शिक्षा झाली. त्यानंतर तो जामिनावर सुटला होता. इसीसचे मॉड्युल हिंदुस्थानात राबवण्यासाठी साकीबने नेटवर्क तयार केले होते. खलिस्तानवाद्यांशी कनेक्शन असल्याचे सिद्ध झाल्यामुळे साकीबला अटकही झाली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;