अमेरिकन मांसभक्षी माशांचा वसईकरांवर हल्ला; यलो जॅकेटची दहशत, गावकऱ्यांना डंख

अमेरिकन मांसभक्षी माशांचा वसईकरांवर हल्ला; यलो जॅकेटची दहशत, गावकऱ्यांना डंख

अमेरिकन मांसभक्षी माशांनी सध्या वसईत अक्षरशः उच्छाद मांडला असून अनेक नागरिकांवर जोरदार हल्ला केला आहे. यलो जॅकेट प्रजातीच्या या माशांच्या दहशतीबाबत काही नागरिकांनी वनविभाग व पालिकेकडे तक्रारही केली. मात्र अधिकाऱ्यांनी आमच्याकडे या माशीला प्रतिबंधित करण्यासाठी कोणतेही औषध नसल्याचे सांगत हात वर केले आहेत. त्यामुळे या अमेरिकन डंखापासून वाचायचे तरी कसे, असा प्रश्न वसईकरांना पडला आहे.

वसईतील नाळे गावातील लाखोडी येथे राहणाऱ्या विनायक पाटील यांच्या घराजवळ एक भेंडीचे जुने झाड आहे. चार दिवसांपूर्वी झाडाच्या खोडामध्ये त्यांना काही माशांचा थवा आढळून आला होता. मधमाशा असाव्यात असा समज झाल्यामुळे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यानंतर रहदारीचा मार्ग असल्यामुळे या झाडाजवळून जाणाऱ्या ग्रामस्थांना या माशांनी डंख मारायला सुरुवात केल्यामुळे अखेर विनायक पाटील यांनी पालिका आरोग्य विभागाला कळवले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिल्यावर अशा माशांवर फवारणी करण्यासाठी आमच्याकडे औषध उपलब्ध नसल्याचे सांगत हात झटकले. नालासोपारा येथील पालिका अग्निशमन दलाला कळविण्यात आले. मात्र सर्वसाधारण मधमाशीसारखी दिसणारी ही माशी वेगळी दिसत असल्यामुळे पालिकेकडे या माशीला प्रतिबंध करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याचे सांगितले.

नागरिकांनो सावध राहा !
पालिकेने सांगितल्याप्रमाणे विरार येथील सह्याद्री हनीचे संचालक संजीव नाईक यांच्याशी संपर्क साधण्यात आला. नाईक यांनी सदर माशी ही हानेंट प्रजातीची असून तिची यलो जॅकेट अशी ओळख आहे असे सांगितले. माशी आक्रमक व मांसाहारी असल्याचे सांगत त्यांनी ग्रामस्थांना सावध राहण्यास सांगितले आहे. विशिष्ट प्रकारचा गणवेश घालून द्रव्ययुक्त नायट्रोजन व पेट्रोलचा मारा करून या माशांचा उपद्रव थांबवता येईल असे संजीव नाईक यांनी सांगितले आहे.

‘हॉर्नेट’ आणि ‘यलो जॅकेट’ हे दोन्ही कीटकांचे प्रकार आहेत. मराठीमध्ये त्यांना ‘वळवळ्या’ असेही म्हटले जाते. ‘यलो जॅकेट’ जमिनीमध्ये घरटे बनवणारे आणि ‘हॉर्नेट’ म्हणजे जमिनीवर किंवा झाडांवर घरटे बनवणारे अशी ओळख आहे. ‘यलो जॅकेट’ हे संपूर्ण उत्तर अमेरिकेत आढळणारे भक्षक आहेत. जर्मन यलो जॅकेट प्रथम १९७५ मध्ये ओहायोमध्ये दिसले आणि आता ते राज्यातील प्रमुख प्रजाती म्हणून ओळखले जाते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;