शिंद्यांचे खासदार संदिपान भुमरे यांचा चालक दीडशे कोटींच्या जमिनीचा मालक

शिंद्यांचे खासदार संदिपान भुमरे यांचा चालक दीडशे कोटींच्या जमिनीचा मालक

महायुतीच्या नेत्यांचे घोटाळे मागील काही दिवसांपासून उघडकीस येत आहेत. मिंधे गटाचे माजी मंत्री आणि विद्यमान खासदार संदिपान भुमरे यांचा चालक जावेद रसूल शेख याच्या नावे संभाजीनगरमध्ये 150 कोटींची जमीन असल्याची माहिती पुढे आली आहे. हैदराबादच्या सालारजंग कुटुंबाकडून तीन एकरचा भूखंड भेट स्वरुपात चालकाला दिल्याचे सांगितले जात आहे. एक साधा ड्रायव्हर जमीनदार झाल्याचे प्रकरण संशयाच्या भोवऱयात सापडले आहे. यासंदर्भात परभणी येथील एका वकिलाने दिलेल्या तक्रारीवरून संभाजीनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून याची चौकशी सुरू आहे.

हैदराबादमधील सालारजंग कुटुंबीतील वंशजाकडून संदिपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावाने तीन एकर जमीन भेट (हिबानामा) म्हणून देण्यात आली आहे. संभाजीनगरमधील जालना रोडवरील दाऊदपुरा येथील या जमिनीची किंमत 150 कोटी इतकी आहे. याप्रकरणी परभणी येथील वकील मुजाहीद खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून भुमरे यांचा चालक जावेद रसूल शेख याला आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीसाठी बोलावले आहे. त्याच्या आयकर रिटर्नच्या प्रती, उत्पन्नाचे स्थापित स्रोत आणि त्याच्या नावावर बक्षीसपत्र कोणत्या आधारावर करण्यात आले हे स्पष्ट करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.

सालारजंग वंशज मीर मजहर अली खान आणि त्यांच्या सहा नातेवाईकांनी स्वाक्षरी केलेल्या हिबानामाची चौकशी सुरू आहे. सालारजंग कुटुंब हे एक प्रमुख कुलीन कुटुंब होते. ज्यांचे सदस्य पूर्वीच्या हैदराबाद इस्टेटमध्ये निजामांचे पंतप्रधान होते.

वकिलाच्या तक्रारीवरून तपास

संभाजीनगरमध्ये मोक्याच्या ठिकाणी असणारी ही जमीन चालक जावेद रसूल यांना भेट मिळाल्याबद्दल परभणीतील वकील मुजाहीद खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेने तापस सुरू केला आहे. रक्ताच्या नात्यातील व्यक्तीने हिबानामा केल्यास तो वैध ठरतो. मात्र सालारजंगचे वंशज आणि भुमरे यांचा चालक यांचा काहीही संबंध नाही. शिवाय ते इस्लामच्या दोन वेगवेगळ्या पंथांचे आहेत, असा दावा वकील मुजाहीद खान यांनी केला आहे.

भुमरे पितापुत्र संशयाच्या भोवऱयात

संदिपान भुमरे यांनी मंत्रिपदाचा दबाव वापरून चालक जावेद शेख याच्या नावे जमिनीचा हिबानामा करून घेत कोटय़वधी रुपयांची जमीन शासनाची फसवणूक करून लाटल्याची तक्रार वकील मुजाहीद खान यांनी दिली आहे. यामुळे भुमरे पितापुत्र संशयाच्या भोवऱयात सापडले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फडणवीस-शिंदेंनी कितीही आपटाआपट केली तरी मराठी माणसाची एकजूट तुटणार नाही; संजय राऊतांचा घणाघात, मोर्चाबाबत दिली महत्त्वाची माहिती फडणवीस-शिंदेंनी कितीही आपटाआपट केली तरी मराठी माणसाची एकजूट तुटणार नाही; संजय राऊतांचा घणाघात, मोर्चाबाबत दिली महत्त्वाची माहिती
हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्राविरोधात येत्या 5 जुलैला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे...
मला वास्तुतज्ज्ञ बनायचे होते, पण…; वडिलांच्या आठवणींत भावुक झाले CJI गवई
आमच्या क्षेपणास्त्रांचा वर्षाव होताच इस्रायल ‘डॅडीं’कडे पळाला! इराणचा नेत्यानाहूंना टोला
Pandharpur Wari 2025 – मुस्लिम तरुणाची विठ्ठल भक्ती; दगड फोडणाऱ्या भक्तानं अर्पण केला चांदीचा मुकूट
झारीतील शुक्राचार्य कोण? पबला कोणाचा आशीर्वाद? खासदाराचा भाजपला घरचा आहेर
बार्शीत भाजपच्या माजी आमदाराच्या मुलाची दादागिरी; माना मुरगाळण्याची धमकी!
Shefali Jariwala Death Reason : शेफालीचा मृत्यू, या 5 कारणामुळे येऊ शकतो कार्डियाक अरेस्ट