Thane News – मुंब्य्रात “त्याच” वळणाने घात केला, लोकलमधून कोसळून तरुणाचा मृत्यू

Thane News – मुंब्य्रात “त्याच” वळणाने घात केला, लोकलमधून कोसळून तरुणाचा मृत्यू

मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील अपघाताची घटना ताजी असतानाच “त्याच” धोकादायक वळणाने शनिवारी आणखी एक बळी घेतला. गर्दीमुळे दारात उभ्या असलेल्या तरुणाचा ट्रॅकवर कोसळून मृत्यू झाला. आयान शेख (21) असे या मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुंब्य्रातील ‘त्या’ धोकादायक वळणावर 9 जून रोजी अपघात झाला होता. दारात उभ्या असलेल्या सहा प्रवाशांचा धावत्या लोकलमधून पडल्याने बळी गेला. कसारा-सीएसएमटी आणि सीएसएमटी-कर्जत या दोन लोकलमधील एकूण 13 प्रवासी रुळावर पडले. रेल्वे अपघातातील चौकशी समितीने मात्र या अपघाताचे खापर प्रवाशांवर फोडत हात वर केले आहेत. रेल्वेच्या संबंधित विभागाचे अधिकारी देखील रेल्वे पोलिसांच्या तपास पथकाला सहकार्य करत नसल्याचे समोर येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;